Office Tips : शर्टाच्या रंगानुसार असा निवडा टाय आणि दिसा स्मार्ट

स्मार्ट लूक मिळवण्यासाठी अशाप्रकारे शर्टनुसार टाय घाला.
Office Tips : शर्टाच्या रंगानुसार असा निवडा टाय आणि दिसा स्मार्ट
office tips in Marathi, Fashion Tips in Marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ऑफिसला (Office) किंवा मुलाखतीला जाताना आपला बऱ्याचदा गोंधळ उडतो. शर्टाचा रंग, टाय आणि ट्रेंडिंग फॅशन (Fashion) नेमके कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायला हवे हे आपल्याला कळत नाही. आपल्यापैकी अनेकांना फॉर्मल कपड्यांसोबत टाय घालायला आवडते. टाय घातल्याने आपल्या व्यक्तिमत्वात भर पडते. परंतु, वैताग तेव्हा होतो जेव्हा आपण आपल्या शर्टाशी टाय जुळवू शकत नाही. हे सहसा प्रत्येकासोबत घडते. (office tips in Marathi)

हे देखील पहा -

शर्टाशी टायमिंग जुळले नाही तर आपला लूक थोडा विचित्र दिसतो. आपण मुलाखतीला जात असू आणि आपल्याला फॉर्मल ड्रेस घालायचा असेल तर त्यावेळी आपल्याकडे टाय असणे आवश्यक आहे. कोणत्या शर्टला कोणत्या रंगाची आणि डिझाईनची टाय जुळवावी हे आपण जाणून घेऊया.

असा निवडा योग्य टाय -

१. टाय निवडताना शर्टाचा रंग नेहमी लक्षात ठेवा. शर्टाच्या रंगानुसार आपण शूज आणि टाय निवडा. पांढरा शर्ट घालणार असाल तर त्यावर निळा किंवा काळा टाय चांगला दिसेल.

office tips in Marathi, Fashion Tips in Marathi
Fashion Tips : जीन्सची खरेदी करताना या टिप्स फॉलो करा

२. बहुतेक रंग आणि प्रिंटमधील टाय या घन रंगाच्या शर्टाशी सहजपणे जुळतात. जर निळ्या शर्टसोबत लाल टाय, गुलाबी शर्टासोबत नेव्ही ब्लू टाय घालू आपण घालू शकता, पण हे लक्षात असू द्या तुम्ही फिकट रंगाच्या शर्टासोबत डिझाईनची टाय घालू नका तसेच, गडद रंगाच्या शर्टसोबत साधी टाय घातली तर तुमचा लूक खराब दिसेल.

३. लहान चेक किंवा पॅटर्नचा शर्ट घालत असाल तर त्यावर साधा किंवा हलका डिझाईनचा टाय घालावा. याशिवाय शर्टचा पॅटर्न किंवा चेक मोठ्या आकाराचा असेल तर लहान पॅटर्न किंवा डिझाइन असलेली टाय निवडा.

४. डेनिम शर्टसोबत टाय घालत असाल तर ही तुमची पूर्णपणे योग्य निवड आहे. ही निवड तुम्हाला ट्रेंडी (Trend) लुक देईल. डेनिम शर्टसह तुम्ही टेक्सचर्ड टाय किंवा लोकरी टाय घालू शकता. या प्रकारच्या शर्टसोबत सिल्क टाय घालणे टाळा.

अशाप्रकारे तुम्ही सहज पध्दतीने टाय निवडू शकता.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.