Diabetes Control: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी प्या 'ही' पेये

मधुमेहाच्या (Diabetes)रुग्णांना तर त्यांच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते.
Diabetes Control: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी प्या 'ही' पेये
Diabetes Control: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी प्या 'ही' पेये

Diabetes Control Drinks निरोगी शरीरासाठी चांगला आहार अत्यंत महत्वाचा आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी, आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यायला हवे. त्याचप्रमाणे निरोगी जीवनासाठी रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात ठेवणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. जेव्हा साखरेची पातळी वाढते तेव्हा अनेक आजार शरीरात घर करून जातात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये (Lifestyle) काही बदल केले पाहिजेत. मधुमेहाच्या (Diabetes)रुग्णांना तर त्यांच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. रक्तातील साखरेची पातळी (Blood Suger level)वाढणे आणि कमी होणे मधुमेहाच्या आहारावरच अवलंबून असते. आज आम्ही तुम्हाला अशीच निरोगी पेये सांगणार आहोत, ज्यांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर सकारात्मक परिणाम होतो.

हे देखील पहा-

निरोगी पेये

निरोगी पेयांपैकी एक आहे हर्बल चहा. हर्बल चहा (Herble tea) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो त्यामुळे आपले आरोग्यही चांगले राहते.

ज्येष्ठमध हा देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी ज्येष्ठमधाच्या काही काड्या पाण्यात उकळा. ते पाणी थंड झाल्यावर गाळून घ्याआणि प्या. त्याची चवही चांगली असते आणि त्यामुळे साखरही कमी होते.

भेंडी (LeadyFinger) डायबेटिस पेशंटसाठी खूप फायदेशीर आहे. बाजारात सहज उपलब्ध होणारी भेंडी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूपच उपयुक्त आहे. भेंडीचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 7.45 ग्रॅम आहे. यासह, यात अँटी-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम आणि मुबलक फायबर असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. शक्य असल्यास रोज एक ग्लास भेंडीचे पाणी प्या.

Diabetes Control: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी प्या 'ही' पेये
Diet After Delivery: प्रसुतीनंतर महिलेने आवर्जून खावेत 'हे' पदार्थ

Diabetes Control Drinks: हे पेय मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मेथीचे दाणे(Fenugreek seeds) खूप फायदेशीर असतात. यात हायड्रोक्सिसिल्युसीन नावाचे 4 अमीनो अॅसिड असतात. यासह, हे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण देखील वाढवते. शक्य असल्यास दररोज मेथी चहाचे सेवन करा. यासाठी दीड कप पाण्यात एक चमचा मेथी दाणे मिसळा. ते चांगले उकळा. पाणी अर्धे झाल्यावर गाळून घ्या. थंड झाल्यावर प्या.

तुमच्या स्वयंपाकघरात उपस्थित असलेला ओवा (Trachyspermum ammi or Ajwain) मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो. ओवा पित्तासह रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करतो. ओव्याचे पाणी करण्यासाठी एक ग्लास गरम पाणी घ्या, एक चमचा ओवा घालून प्या. याशिवाय, एका ग्लास पाण्यात एक चमचा ओवा रात्रभर भिजत घाला. हे पाणी सकाळी गाळून प्या.

त्याचबरोबर सफरचंद सायडर व्हिनेगर (Apple cider vinegar) देखील मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहे. सफरचंद व्हिनेगरमधील एसिटिक अॅसिड अँटीग्लाइसेमिक प्रभावांनी समृद्ध आहे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात दोन चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून प्या.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com