Cookies Recipe For Diabetic Patient : मधुमेहींनो, सतत गोड खाण्याची इच्छा होतेय? मग नाचणीचे कुकीज नक्की ट्राय करा

Cookies Recipe : मधुमेह रोग्यांना डाइटीशीयन नाचणीचे सेवन करण्याच्या सल्ला देतात.
Cookies Recipe For Diabetic Patient
Cookies Recipe For Diabetic PatientSaam Tv

Ragi Cookies Recipe : मधुमेह रोग्यांना डाइटीशीयन नाचणीचे सेवन करण्याच्या सल्ला देतात. सोबतच नाचणी मधील पोषक तत्व तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. नाचणी हा एक धान्याचा प्रकार आहे. ज्याचे साउथ इंडियन व्यक्ती भरपूर प्रमाणात वापर करतात.

अशातच अनेक आफ्रिकन कंट्रीमध्ये नाचणी खाल्ली जाते. पोषक तत्त्वांनी भरपूर असलेली नाचणी आपल्या गुणांसाठी प्रचलित असते. अशातच वजन कमी करण्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त ठरते.

Cookies Recipe For Diabetic Patient
Brinjal And Diabetes : मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी वांग आहे रामबाण, अशा पद्धतीने खाल्ल्यास होईल फायदा !

मधुमेह (Diabetes) झालेल्या व्यक्तींना नाचणी खाण्याचा सल्ला दिला जातो. अशातच तुम्ही तुमच्या आहारामध्ये नाचणी पासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या व्यंजनांचा समावेश करू शकता. आज आम्ही तुम्हाला नाचणी पासुन कुकीज बनवायला शिकवणार आहोत.

नाचणीचे कुकीज (Cookies) चविष्ट असल्यासोबत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. तुम्ही हे कुकीज स्नॅक्समध्ये एन्जॉय करू शकतात. सोबतच लहान मुलांच्या आरोग्यासाठी नाचणीचे सेवन अत्यंत फायदेशीर असते.

Cookies Recipe For Diabetic Patient
Diabetes Health Care : मधुमेही रुग्णांच्या शरीराच्या 'या' भागावर होतो परिणाम, जाणून घ्या उपाय

का आहे नाचणी एवढी पौष्टिक -

फूड डेटा सेंटरतर्फे नाचणीला घेऊन प्रकाशित केलेल्या एका डेटा नुसार, नाचणी प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, सोडियम, फायबर आणि विभिन्न प्रकारच्या मिनरल्सचे एक स्त्रोत आहे. सोबतच यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. सोबतच नाचणी अँटिऑक्सिडेंटने भरपूर असते आणि ग्लूटन फ्री सुद्धा असते.

नाचणीचे नियमित सेवन केल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींना चांगला फायदा होतो. कारण की यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण उपलब्ध असते. सोबतच ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्याचे काम नाचणी करते.

नाचणीमध्ये उपलब्ध असलेले कॅल्शियम दातांसाठी आणि हाडांसाठी अतिशय फायदेशीर असतात. यामध्ये असलेले फायबर तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्याचे काम करते. सोबतच कफ, अपचन आणि पोटाच्या समस्येपासून सुटकारा देण्यासाठी नाचणी उपयुक्त ठरते.

नाचणीचे कुकीज बनवण्याची सामग्री -

नाचणीचे पीठ एक कप, साखरेचे हेल्दी विकल्प एक कप, चार ते पाच चमचे मध, एक कप बदाम, एक चमचा वेलची पूड, एक चमचा बेकिंग पावडर, एक अंड, ऑलिव्ह ऑइल, चवीनुसार मीठ.

बनवण्याची विधी -

  • एका पॅनमध्ये नाचणीचे पीठ, बादाम आणि वेलची पूड घालून चांगल्या प्रकारे ड्राय रोस्ट करून घ्या.

  • नंतर एका वाटीमध्ये अंड घेऊन त्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्या. तुम्ही अंड्याचे सेवन करत नसाल तर तुम्ही अंड स्किप करू शकता.

  • त्या वाटीमध्ये रोस्ट केलेले नाचणीचे पीठ आणि बादाम घालून मिक्स करून घ्या आणि मग सुद्धा टाकून घ्या. त्यानंतर वरून ऑलिव्ह ऑइल टाका.

  • कन्सिस्टन्सी जास्त घट्ट असेल तर, यामध्ये थोडसं पाणी मिक्स करा. त्यानंतर सगळे मिश्रण तीन ते चार मिनिटे चांगले फेटून घ्या.

  • तुमचा कुकीजचा डो बनवून तयार आहे. या डोला झाकून सोडून द्या. त्यानंतर बनवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या.

  • आता एका ट्रेमध्ये ऑइल लावून पिठाचे गोळे ट्रेमध्ये ठेवून हाताच्या साहाय्याने गोळे चपटे करून घ्या म्हणजेच त्यांना कुकीजचा आकार देऊन टाका.

  • त्यानंतर बेक करण्यासाठी तुम्ही पाच ते दहा मिनिटे कुकीज मायक्रो ओवनमध्ये ठेवू शकता. जर तुमच्याकडे मायक्रो ओवन नसेल तर तुम्ही बाहेरील मोठ्या बेकरीमधून कुकीज भाजून आणू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com