सामान्यांच्या खिशाला कात्री! 'या' जिल्ह्यात पेट्रोल 120 रुपयांवर; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

भारतीय तेल कंपन्यांकडून रोज पेट्रोल- डिझेलच्या (Petrol-Diesel) भावात वाढ होत आहे.
Petrol Price Updates | Petrol rates
Petrol Price Updates | Petrol ratesSaam Tv

वृत्तसंस्था: भारतीय तेल कंपन्यांकडून रोज पेट्रोल- डिझेलच्या (Petrol-Diesel) भावात वाढ होत आहे. गेल्या १४ दिवसात आज पेट्रोल- डिझेलच्या भावात बारावी वाढ करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका देत सतत पेट्रोल-डिझेलच्या भावामध्ये वाढ होत आहे. अशातच महाराष्ट्राबरोबरच मुंबईच्या (Mumbai) सर्व शहरांमध्ये आज देखील इंधनाचा भाव कडाडले आहेत. जाणून घेऊयात या शहरांमध्ये १ लिटर पेट्रोल-डिझेलच्या (Diesel) भाव कितीने महागले आहेत.

हे देखील पहा-

महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव काय?

देशाच्या सर्व राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात (Maharashtra) आज पेट्रोल-डिझेलच्या भावामध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज ४३.४३ पैशांच्या वाढीनंतर पेट्रोलचे भाव ११८.८३ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे भाव १०३.०७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर पुण्यात (Pune) आज पेट्रोलचे भाव ११८.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे भाव १०१.१३ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. नागपूरमध्ये आज पेट्रोल भाव ११८.४९ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे भाव १०१.२४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. कोल्हापुरात (Kolhapur) देखील पेट्रोलचे भाव ११८.७४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे भाव १०१.४७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.

Petrol Price Updates | Petrol rates
औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा ऑनलाइन तलवारी खरेदी; ३ तलवारी जप्त

शहरं पेट्रोलचे भाव (प्रति लिटर) डिझेलचे भाव (प्रति लिटर)

मुंबई 118.83 रुपये 103.07 रुपये

पुणे 118.41 रुपये 101.13 रुपये

नाशिक 118.95 रुपये 101.65 रुपये

परभणी 120.36 रुपये 103.02 रुपये

औरंगाबाद 119.55 रुपये 102.23 रुपये

कोल्हापूर 118.74 रुपये 101.47 रुपये

नागपूर 118.49 रुपये 101.24 रुपये

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com