डेटिंग आणि रिलेशनशीपमध्ये नेमका फरक काय जाणून घ्या

हल्लीच्या काळात डेटिंग करणे ही सामान्य गोष्ट झाली आहे.
डेटिंग आणि रिलेशनशीपमध्ये नेमका फरक काय जाणून घ्या
Dating Vs Relationshipब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हल्लीच्या काळात डेटिंग करणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. कॉलेजपासून ते आपल्या ऑफिसमधील सहकर्मचाऱ्याला सहज डेट करता येते. सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीत डेटिंग करणे हे ट्रेंड (Trend) झाले आहे.

हे देखील पहा -

आपल्यापैकी बरेच लोक आपल्याला हवा तसा जोडीदार शोधण्यासाठी डेटिंगसारख्या अनेक नवनवीन अॅप्सचा वापर करतात. त्यातील काही लोक रिलेशनशीपमध्ये येतात परंतु त्यांना डेटिंग आणि रिलेशनशीपमधला नेमका फरक कळत नाही व ते त्या नात्याचा एकतर गैरफायदा घेतात किंवा त्यात अडकत जातात. डेटिंग (Dating) व रिलेशनशीप या दोन्ही गोष्टी आणि त्याचे अर्थ खरेतर वेगळे आहे. स्टाइलक्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार नात्यात जेव्हा दोघे एकमेकांना समजून घेण्याचा आणि ओळखण्याचा प्रयत्न करत असतात व त्या नात्याला सुरूवात होत असते त्या टप्प्याला डेटिंग असे म्हणता येईल. तसेच ज्याक्षणी त्यांचे नाते अधिक खुलू लागते व ते अधिक घट्ट होते त्याला रिलेशनशिप असे म्हणता येईल. या दोघांमधील नेमका फरक काय हे जाणून घेऊया.

डेटिंग आणि रिलेशनशीपमधला नेमका फरक काय-

१. नात्याची सुरुवातीच्या टप्प्यात एकमेकांना जाणून घेण्याचा किंवा ओळखण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण एकमेकांना डेट करत असतो. याउलट जेव्हा आपण एकमेकांना आवडू लागतो व आपल्या भविष्याची स्वप्ने एकमेकांसोबत रंगवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपण त्या नात्याला रिलेशनशीप असे नाव देतो.

Dating Vs Relationship
आपली मैत्री आपल्यापासून दूरावत तर नाही ना !

२. आपण आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीसोबत राहू लागतो किंवा त्या व्यक्तीसोबत आपल्याला वेळ घालवण्यास अधिक आवडत असेल त्याला डेटिंग म्हणता येणार नाही. तसेच ज्या नात्यात आपण शारीरिक व मानसिकरित्या एकमेकांशी जोडले जातो तेव्हा रिलेशनशीपमध्ये असतो हे समजून घ्या.

३. डेटिंगसारख्या अॅप्सवरुन आपण समोरच्या व्यक्तीसोबत फक्त हँग आउट किंवा मेक आउट करत असू पण त्याच्यासोबत भावनिकरित्या जोडले गेलो नसू तर त्याला डेट करणे असे म्हटले जाते.

४. डेटिंग हे अगदी कमी काळासाठी असते व रिलेशनशीप हे अधिक काळासाठी असते त्यासाठी दोघांमधला फरक समजून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच या दोन्ही गोष्टींची स्वत:ची अशी वेगळी शैली आहे. या दोघांमधला फरक कळाला तर आपण कोणत्याही नात्यात अडकू शकणार नाही.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com