Daily योग: पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी करा नौकासन

दीर्घायुषी व्हायचं असेल तर दैनंदिन जीवनात योग करणं अत्यंत गरजेचं आहे.
Daily योग: पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी करा नौकासन
Daily योग: पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी करा नौकासनSaam Tv

दीर्घायुषी व्हायचं असेल तर दैनंदिन जीवनात योग करणं अत्यंत गरजेचं आहे. यापूर्वी आपण अनेक योग प्रकार पाहिले आहेत. त्यामध्येच आता पोटावर केल्या जाणाऱ्या आसनांपैकी एक महत्त्वपूर्ण असलेल्या नौकासन या आसनाविषयी जाणून घेणार आहोत.

हे देखील पहा-

नौकासनाचे फायदे -

१. हे आसन पोटावर झोपून केल्यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
२. वजन नियंत्रणात राहते.
३. पाठीचा कणा सरळ राहण्यासाठी मदत मिळते.
४. पाठदुखीच्या समस्या दूर होतात.
५. पचनक्रिया सुरळीत होते.
६. बद्धकोष्ठता, गॅस यासारखे पोटाचे विकार होत नाहीत.
७. किडनीशी निगडीत समस्या दूर होते.

Daily योग: पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी करा नौकासन
जाणून घ्या, का करावे अर्ध शलभासन?

कसे करावे नौकासन?

प्रथम पोटावर झोपावे आणि दोन्ही पाया जुळवून घ्यावेत. यावेळी हात शरीराजवळ ठेवावेत. त्यानंतर हळूहळू श्वास घेत हात व पाय एकाच वेळी हवेत उचलावेत. साधारणपणे ३० अंशांपर्यंत हात व पाय उचलावेत. यावेळी शरीराचा सगळा तोल पोटावर येईल अशा स्थितीत रहावे. काही वेळ याच स्थितीत राहून नंतर हळूहळू पूर्वपदावर यावे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com