Do not follow the fashion tips at 40s : वयाच्या 40व्या वर्षीही हँडसम दिसण्यासाठी 'या' 6 ड्रेसिंग ट्रेंडचे अनुकरण कधीच करू नका

Fashion Tips : सर्वप्रथम जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, आपले वाढणारे वय कशा पद्धतीने ग्रेसफुल बनू शकते.
Do not follow the fashion tips at 40s
Do not follow the fashion tips at 40sSaam Tv

Men's Guide To Dressing In your 40S : वयाच्या चाळीसाव्या वर्षात प्रवेश करताना अनेक गोष्टी बदलतात. तुम्ही गोष्टींकडे पूर्वीपेक्षा अधिक अनुभवी पद्धतीने पाहता. त्यासोबतच इतर लोकही तुमचा आदर करू लागतात याचे कारण तुमचे शारीरिक बदल असे म्हणता येईल.

परंतु तुम्ही स्वतःला ज्या पद्धतीने कॅरी करता तसेच लोकांशी तुमच्याशी वागणूक ही असते. म्हणून सर्वप्रथम जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, आपले वाढणारे वय कशा पद्धतीने ग्रेसफुल बनू शकते.

Do not follow the fashion tips at 40s
Fashion Tips : ऑफिस किंवा फंक्शनसाठी सुंदर लूक मिळवायचा आहे ? 'हे' 5 फुटवेअर नक्की ट्राय करा !

त्यामुळे आज हा लेख तुम्हाला मदत करेल. चला तर मग जाणून घेऊया वयाच्या चाळीस वर्षानंतरही हँडसम दिसण्यासाठी तुमचा ड्रेसिंग सेन्स कसा सुंदर ठेवू शकता आणि कोणत्या फॅशन (Fashion) टाळू शकता.

1. कार्गो शॉट्सला नाही म्हणा

कार्गो शॉर्ट किंवा कार्गो पॅन्ट वेअर करणे टाळा. जरी हे तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असले तरी ते तुमच्या ग्रेसला कमी करू शकते. म्हणून वयाच्या 40 नंतर हँडसम दिसण्यासाठी या ड्रेसिंग पासून दूर राहणे गरजेचे आहे.

2. पांढरा टी-शर्ट घालू नका

जर तुम्ही पांढरा टी-शर्ट घातला तर ते झोपेतून उठल्यासारखे दिसते. त्यामुळे या टी-शर्ट पासून दूर राहिलेलेच बरे. तरीही जर तुम्हाला पांढरे टी-शर्ट घालायला आवडत असेल तर तुम्ही केवळ कॉलर असलेले टी-शर्ट आणि प्रेस केलेले टी-शर्ट घाला.

Do not follow the fashion tips at 40s
Wedding Fashion Tips : लग्नात गॉगल घालून मिरवायचे आहे? फॉलो करा 'या' टिप्स

3. डेनिम जॅकेट घालणे टाळा

डेनिम जॅकेट तुमचा लूक चांगला बनवते. मात्र,तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी डेनिम जॅकेट घातल्यास तुमचा लूक तेवढा आकर्षित दिसणार नाही, त्यामुळे डेनिम जॅकेट घालणे टाळा.

4. फिकट जीन्स अजिबात घालू नका

तुम्हाला जीन्स (Jeans) घालण्याची आवड असल्यास तुम्ही क्लासिक रंगाची किंवा डार्क रंगाची जिन्स घातल्यास अधिक आकर्षित दिसाल. मात्र फिकट जीन्स अजिबात घालू नका. त्यासोबतच प्रिंटेड किंवा शेडेड जीन्स घालने टाळा.

5. वेल फिटिंग ड्रेस परिधान करा

वयाच्या 40 व्या वर्षीही वेल फिटिंग ड्रेसिंग केल्यास तुमचा लूक अधिक आकर्षक दिसतो. मात्र ओव्हर साईज कपडे अजिबात घालू नका. तुमच्यासाठी व्यवस्थित असेल अशा साइजचे कपडे परिधान करा.

Do not follow the fashion tips at 40s
Shoes Fashion : कमी उंचीच्या मुलींना आकर्षक दिसतील 'हे' शूज, जाणून घ्या

6. क्लासिक शूज बेस्ट

जर तुम्हाला स्वतःसाठी स्नीकर्स खरेदी करायचे असेल तर नियॉन रंगाचे किंवा व्हायब्रंट रंगाचे शूज अजिबात घेऊ नका. परिस्थितीत पांढऱ्या किंवा काळया रंगाचे स्नीकर्स, स्पोर्ट शूज घेतल्यास बरे होईल. जर तुम्हाला फॉर्मल शूज घ्यायचे असेल तर काळे आणि गडद तपकिरी रंग उत्तम असतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com