Blood sugar : या पदार्थांचे सेवन करु नका, वाढेल रक्तातील साखर

White Food रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही पांढऱ्या रंगाच्या पदार्थांमध्ये स्टार्च आणि साखरेसारखे कार्बोहायड्रेट भरलेले असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.
Blood sugar : या पदार्थांचे सेवन करु नका, वाढेल रक्तातील साखर
How to control diabetes in Marathi, Diabetes prevention tips in Marathi, how to prevent diabetes, Diabetes Control Tips, diabetes and heart disease dietब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई :मधुमेह किंवा डायबिटीज (diabetes) हा एक आजार आहे. खरेतर हा आजार आनुवंशिक असतो किंवा सतत चिंताग्रस्त असणे, गोडाचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास मधुमेह हा आजार होतो. या आजारावर अजूनही औषध मिळालेले नाही. जर काही हेल्थी पदार्थांचा आहारात समावेश केला तर आपण काही अंशी त्याला नियंत्रणात आणू शकतो. (How to control diabetes in Marathi)

वेगवेगळे पदार्थ शरीराला वेगवेगळे पोषकतत्वे देतात. मधुमेहाचा रुग्ण असो किंवा सामान्य व्यक्ती, शरीरातील चांगल्या कार्यासाठी प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि इतर सर्व पोषक घटक आवश्यक असतात. परंतु मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी ज्या पदार्थांमधे कर्बोदके जास्त असतात अशा वेळी त्याचे कमी प्रमाणात सेवन करावे किंवा असे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.

हे देखील पाहा-

अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्सचे तीन मुख्य प्रकार आहेत स्टार्च, साखर (Sugar) आणि फायबर. मधुमेह असणा-या रुग्णांमधे स्टार्च आणि साखर ही सर्वात मोठी समस्या दिसून येत आहे. कारण शरीरातील ग्लुकोज कमी होत जाते. त्याचप्रमाणे कार्बोहायड्रेट किंवा स्टार्च आवश्यक प्रमाणात मिळत नाही. यात साखरेचे सेवन केल्यास ती शरीरात लवकर शोषली जाते आणि त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. यामुळे रक्तातील साखर वाढते. रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही पांढऱ्या रंगाच्या पदार्थांमध्ये स्टार्च आणि साखरेसारखे कार्बोहायड्रेट भरलेले असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.

How to control diabetes in Marathi, Diabetes prevention tips in Marathi, how to prevent diabetes, Diabetes Control Tips, diabetes and heart disease diet
Exercise : या पाच कारणांमुळे आवश्यक आहे वॉर्मअप एक्सरसाइज

कोणत्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

१. पास्ता - पास्ता हा सॉस, क्रीम, चीज आणि भरपूर बटर घालून बनवला जातो. यात अधिक प्रमाणात कॅलरीज, फॅट्स व कार्बोहायड्रेट असते. हे सर्व मैद्याच्या पिठापासून बनवले जाते ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे लठ्ठपणाचा धोकाही वाढतो.

२. बटाटा - अगदी लहानांपासून-मोठ्यापर्यंत बटाटा हा सर्वांना आवडतो. परंतु बटाट्याचे सेवन केल्यास कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

३. मैदा - यात जवळजवळ स्टार्च (७३.९%) असते तर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचे प्रमाण कमी असते. मैद्यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक असते. या पिठाचा जास्त वापर केल्यास बद्धकोष्ठते संबंधित त्रास होतो. यात ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असल्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मैद्याचे सेवन योग्य नाही.

४. साखर - साखरेपासून बनवलेल्या प्रत्येक पदार्थात अधिकतर साखर आणि खराब कार्बोहायड्रेट्स असतात. साखरेत पौष्टिक मूल्य कमी असते त्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते. साखरेमुळे वजन वाढते तसेच हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो.

५. भात - मधुमेह असणा-या रुग्णांनी भाताचे सेवन करु नये. भाताचे सेवन केल्यास दोन प्रकारच्या डायबिटीजचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला प्री-डायबिटीज असेल तर तुम्ही भात खाण्याचा विचार करु नये. पांढऱ्या तांदळात उच्च ग्लायसेमिक असल्यामुळे ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकते.

६. व्हाईट ब्रेड - व्हाईट ब्रेड हा पांढ-या पिठापासून बनविला जातो हा स्टार्चने भरलेला असतो. या गोष्टी साखरेप्रमाणे काम करतात आणि लवकर पचतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यांच्याकडे उच्च ग्लायसेमिक असल्यामुळे व्हाईट ब्रेडचे सेवन केल्यास फायबरची कमतरता होते.

या पदार्थांचे सेवन करणे टाळल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो.

डिस्क्लेमर: हा आहार फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.