
Heart Attack Symptoms : हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा प्रॉब्लम याला आजच्या जीवनशैलीमध्ये सर्वसामान्य पाहिले जात आहे. पाहायला गेलं तर अशी बरीच कारणं आहेत ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या हृदयाचे प्रॉब्लेम आणि स्ट्रोकचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीकडे नजर अंदाज केल्याने तुमच्या जीवावर देखील बेतू शकते.
अनियमित जीवनशैलीमुळे लोकांमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. स्ट्रेस, अयोग्य खानपान, खराब लाइफस्टाइल, झोप पूर्ण न होणे, दारू आणि सिगरेट या गोष्टींचे प्रमाण जास्त वाढल्याने तुम्हाला हृदयविकारासारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागू शकते. हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या धोक्यापासून वाचण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांवरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशा समस्याबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचे प्रमाण जास्त वाढेल. चला तर मग जाणून घेऊया त्या समस्यांबद्दल, ज्याला आपण वेळोवेळी दुर्लक्ष करत असतो.
1. कोलेस्ट्रॉल :
कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरामध्ये उपलब्ध असलेला वॅक्स सारखा पदार्थ आहे. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल वाढल्यावर आपल्या धमन्या ब्लॉक होतात. ज्यामुळे तुमच्या हृदयापर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोहोचत नाही. म्हणूनच तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची समस्या वाढू लागते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये डायट्री फायबर, लो फॅट फुड्स यांचे सेवन केले पाहिजे आणि त्याचबरोबर दररोज नितीननियमाने व्यायाम देखील गेला पाहिजे.
2. मधुमेह (Diabetes) :
तुमच्या शरीरामधील ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यास अडथळा निर्माण होत असेल तर तुमच्या हृदयाला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे तुम्ही एक हेल्दी डायट प्लॅन करा. आणि वेळोवेळी तुमचं ब्लड शुगर लेवल चेक करत रहा. असं केल्याने तुम्हाला तुमची समस्या देखील समजेल आणि त्यावरती तात्काळ उपचार देखील करता येईल.
3. हायपर टेन्शन :
खराब जीवनशैलीमुळे (Lifestyle) बऱ्याच लोकांना हायपर टेन्शनचा प्रॉब्लेम होतो. हायपर टेन्शनमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. हायपर टेन्शनमुळे ब्लड प्रेशर (Blood Pressure) लेवल अनियंत्रित होते. जेव्हा तुमचा ब्लड प्रेशर हाय होतो तेव्हा तुमच्या हृदयाला जास्त काम करावे लागते. त्यामुळे तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवा. यासाठी तुम्ही लो सोडियम आणि लो फॅट डायट त्याचबरोबर एक्सरसाइज करून तुमच ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवा. त्याचबरोबर तुम्ही दारूचे सेवन कमी करा आणि कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस (Stress) घेऊ नका.
4. लठ्ठपणा :
अनियमित खाणपाणमुळे अनेक लोक लठ्ठपणाला त्रासलेली आहे. लठ्ठपणामुळे तुमच्या शरीरामधील कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशरची लेवल जास्त प्रमाणात वाढते. ज्याचा प्रॉब्लेम पुढे जाऊन तुमच्या हृदयावर होतो. त्यामुळे तुम्ही तुमचं वजन मेंटेन ठेवा. यासाठी तुम्ही एक बॅलन्स डाएट ठेवा आणि दररोज फिजिकल ऍक्टिव्हिटी करत रहा.
5. स्मोकिंग :
अनेकांना सिगारेट ओढण्याचा छंद असतो. परंतु ही सवय अतिशय वाईट आहे. सिगारेटमुळे तुम्हाला हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागू शकते. अभ्यासानुसार हा दावा केला जातो की, जे लोक सतत स्मोकिंग करतात त्यांना दोन ते तीन पटीने हार्ट अटॅक यायची संभावना असते. स्मोकिंग केल्याने हृदयापर्यंत ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचते. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढते आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते.
6. नियमितपणे व्यायाम न करणे :
एक्सरसाइज आणि कुठलीही फिजिकल ऍक्टिव्हिटी केली नाही की हृदयासंबंधीचे आजार उद्भवतात. दररोज व्यायाम केल्याने कार्डिओवस्कुलर ही समस्या जास्त प्रमाणात उद्भवत नाही. फिजिकल ऍक्टिव्हिटीज केल्याने तुमचा लठ्ठपणा, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. एक्सरसाइज केल्याने शरीरामधील ब्लड प्रेशर लेवल कमी होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.