Health Tips : व्हायरल फिव्हरचा जास्त ताण; ठरु शकते मृत्यूचे कारण

कानपूरचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अभिनव गुप्ता यांनी व्हायरल इन्फेक्शन बाबत सांगितले आहे.,
Health Tips
Health TipsSaam Tv

Health Tips : शहरातली व्हायरल संसर्गामुळे सगळीकडे सर्दी,ताप,खोकला इत्यादी समस्या उद्भवत आहेत. कानपूरचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अभिनव गुप्ता यांनी व्हायरल इन्फेक्शन बाबत सांगितले आहे.

त्यांचे म्हणणे असे आहे की, हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरावर खराब एलिमेंटचा जास्त प्रभाव पडतो म्हणून जास्त ताण घेतल्याने किंवा व्यायामामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते त्यामुळे व्हायरल मध्ये जास्ती व्यायाम करणे टाळा शरीराला जास्तीत जास्त रिलॅक्स प्रयत्न करा.

Health Tips
Morning Health Tips : सकाळी करा भरपेट नाश्ता, अनेक आजारांचा धोका होईल कमी !

1. हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण तरुणांमध्ये अधिक

डॉक्टर गुप्ता यांच्या मते गेल्या दोन-तीन वर्षापासून तरुणांमधील 30 ते 50 वयोगटातील हृदयविकाराचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामागचे कारण म्हणजे निरोगी (Health) आहार आणि तणाव (Stress) असू शकते. जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याकडे नीट लक्ष देत नाहीत.

बऱ्याच वेळा किरकोळ गोष्टीचा खूप जास्ती तणाव निर्माण करून मानसिक त्रास करून घेतात आणि नकळतपणे त्याकडेही दुर्लक्ष होते. त्यांना असणाऱ्या इतर सवयी म्हणजे अमली पदार्थाचे व्यसन, सिगारेट ओढणे या काही कारणांमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराच्या समस्या वाढताना दिसत आहे. तसेच बीपी आणि ब्लड शुगर लेवल चेक करत नसल्याने त्यांना हिवाळ्यात अधिक धोका वाढतो आणि अशा वेळेस हृदयविकारचा झटका येण्याची शक्यता असते.

Health Tips
Women Health Issues : महिलांना जडतात 'या' 3 प्रकारच्या गंभीर समस्या, वेळीच लक्ष न दिल्यास भोगावे लागतात परिणाम !

2. काळजी कशी घ्याल?

  • हृदयविकाराचा झटका (Heart Attack) टाळण्यासाठी संतुलित आहार खूप गरजेचे असते.

  • जर तुम्ही बीपी, शुगर (Sugar) किंवा इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

  • तसेच औषध वेळेवर घेणे ही तितकेच गरजेचे असते.

  • तुम्हाला जर बीपीचा त्रास असेल तर हिवाळ्यात औषध न चुकता घेतलीच पाहिजे.

  • हिवाळ्यात बीपी वाढण्याच्या समस्यांचा धोका अधिक असतो त्यामुळे आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असते.

  • छातीत दुखणे किंवा हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्या असल्यास त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

  • हृदयरोग किंवा हृदय रोगाच्या रुग्णालयात योग्य ती हृदयासंबंधी ट्रीटमेंट घेतली पाहिजे.

  • हृदयविकराच्या झटक्यामध्ये वेळ खूप महत्त्वाचे असते. वेळेआधी झटक्याबद्दल माहिती पडल्यास रुग्णाचा जीव वाचवता येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com