Heart Care Tips : हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी करा 'हे' 7 उपाय !

धावपळीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दर्लक्ष होत असते खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष नसते.
Heart Care Tips
Heart Care TipsSaam Tv

Heart Care Tips : आताच्या काळात लोक कमी वयातच हृदयविकाराला बळी पडत आहेत हृदयाशी संबंधित अनेक घातक आजार तरुणांना होत आहेत. धावपळीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दर्लक्ष होत असते खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष नसते.

यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते अशा वेळेस तुमच्या दैनंदिन जीवनात काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही या आजारापासून दूर राहू शकता.

Heart Care Tips
Heart Burns Remedies : काहीही खाल्ल्यावर छातीत जळजळ होते? 'हा' आयुर्वेदिक उपाय करून पाहा!

1. निरोगी आहार

योग्य आहाराचा समावेश करून तुम्ही हृदयाच्या समस्या दूर ठेवू शकता त्यासाठी तुम्हाला काही पोषकतत्वानी भरपूर आहाराचा समावेश करणे गरजेचे आहे. फळे,भाज्या,कमी चरबीयुक्त मांस, दुग्धजन्य पदार्थ यांचा सामवेश तुमच्या आहारात करा. मिठाचे सेवन कमी करा आणि साच्युरेटेड फॅट सारखे पदार्थ खाणे टाळा.

2. धूम्रपान बंद करा

धूम्रपान केल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. संबंधित धोका टाळायचा असेल तर तुम्हाला धूम्रपान लवकरात लवकर बंद करणे गरजेचे आहे.

3. ब्लड प्रेशर (Blood Pressure) नियंत्रित

घरी रोज प्रेशर चेक करणे गरजेचे असते हाय ब्लड प्रेशर हे हृदयविकाराचा झटका (Heart-attack) येण्याचे मुख्य कारण आहे. प्रेशर चेक करण्यासाठी तुम्ही बीपी मॉनिटरचा उपयोग करू शकता.ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart Health
Heart HealthCanva

4. एका जागी बसणे कमी करा आणि जास्त फिरा

जर तुम्हाला हृदयासंबंधी आजार दूर ठेवायचे असेल तर रोज व्यायाम करणे गरजेचे आहे तसेच मसल्स मजबूत होण्यासाठी च्या एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. आठवड्यातून कमीत कमी 150 किलोमीटर धावणे गरजेचे आहे. हृदय निरोगी राहण्यासाठी तुम्ही एरोबिक एक्सरसाइज देखील करू शकता.

Heart Care Tips
Winter Heart Care : हिवाळ्यात हार्टअटॅकचे प्रमाण वाढते, त्यापासून बचाव कसा करायचा?

5. अल्कोहोल नको

तुम्ही जर अल्कोहोल घेत असाल तर अल्कोहोल घेणे आत्ताच बंद करा अन्यथा तुम्हाला हृदयाशी संबंधित गंभीर आजाराला सामोरे जावे लागेल. त्यामुळे पेय निवडताना अतिशय हुशारीने पेय निवडणे गरजेचे आहे. या ऐवजी पाणी वापरल्यास कॅलरीज कमी होण्यास मदत मिळते.

6. सल्ल्यानुसार औषधे (Medicine) घ्या

जर तुम्हाला आधीपासून कोणता आजार असेल तर तुमची औषधे तुम्ही नियमितपणे घेण्यासाठी डॉक्टरचा सल्ला फार महत्त्वाचे असतो. कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस या आजारांची औषधे तुम्ही घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे असते तुम्हाला काही कळत नसल्यास डॉक्टरांना विचारा आणि औषधे घेणे टाळू नका.

7. हेल्थ हिस्टरी

तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुमच्या आरोग्याच्या काळजी घेतली पाहिजे. बरेच लोक जुन्या आरोग्याबद्दल फारसे चिंतेत नसतात. तुमच्या आरोग्य संबंधित प्रिकॉशन्स घेणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com