
मुंबई : सकाळी लवकर उठायचे म्हटले तर सगळ्यांच कंटाळा येतो. घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टींमुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो, त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते.असं म्हणतात की सकाळची सुरुवात छान झाली तर संपूर्ण दिवस छान जातो पण त्यासाठी तुमची सकाळची दिनचर्या निरोगी असायला हवी. जर तुम्हाला देखील ऑफिस(Office) मध्ये दिवसभर उत्साही राहायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा सकाळी वापर केल्याने तुम्ही दिवस (day)भर ताजेतवाने आणि ऊर्जावान राहाल. सकाळी उठल्याबरोबर कोणत्या गोष्टी कराव्यात जेणेकरून तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. चला तर मग जाणून घेऊया (How to stay energized during work)
हे देखील पाहा -
या गोष्टी तुम्ही करायला हव्या
१. तुमच्या उठण्याची वेळ निश्चित करा -
दररोज सकाळी तुम्ही तुमच्या उठण्याची वेळ एकच ठेवा. यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि कोणतीही अडचण येणार नाही.
२. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या-
सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रिकाम्या पोटी पाणी (water) प्या. यामागील कारण असे की, पाणी प्यायल्याबरोबर तुम्हाला दाब जाणवेल व तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. त्यामुळे दिवसभर ऑफिसमध्ये तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
३. नाश्त्यात प्रथिने अवश्य घ्या -
ऑफिसला जाण्याच्या घाईत बरेचदा आपण नाश्ता करायचे टाळतो. पण असं अजिबात करू नका. तुम्ही वेळेवर नाश्ता करायला हवा. एवढेच नाही तर नाश्त्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनचा समावेश करा. त्यामुळे तुम्हाला भूकही लागणार नाही व दिवसभर उत्साही वाटेल.
४. सकाळी चालणे अथवा व्यायाम करणे -
सकाळी फिरण्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे तुम्हाला लवकर थकवा जाणवणार नाही. तसेच व्यायाम केल्याने देखील तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल.
५. रिकाम्या पोटी चहाची सवय सोडा -
अनेकांना रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असते. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर ही सवय लगेच सोडा. कारण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
Edited By - Komal Damudre
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.