Makeover : असा करा उन्हाळ्यात घराबाहेर जाताना मेकओवर..!
summer beauty tips in Marathi, Makeover Tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Makeover : असा करा उन्हाळ्यात घराबाहेर जाताना मेकओवर..!

त्वचेवर जमा होणा-या घामामुळे आपल्याला सतत चेहरा पुसावा किंवा धुवावासा वाटतो. अशावेळी मेकअप करुन बाहेर पडणे अंत्यत कठीण होते.

मुंबई : उन्हाळा सुरु झाला की, चेहरा काळा पडतो तर काही वेळेस अधिक उष्णतेमुळे चेह-यावर मुरुमे किंवा पुरळ येऊ लागतात. उकाड्यामुळे सतत घामाच्या धारा सुरु होतात. उन्हाळ्यात तापमानाचा पारा अधिक असल्यामुळे त्वचेला उष्णता जाणवते त्यामुळे त्वचा चिकट व तेलकट होते. त्वचेवर जमा होणा-या घामामुळे आपल्याला सतत चेहरा पुसावा किंवा धुवावासा वाटतो. अशावेळी मेकअप करुन बाहेर पडणे अंत्यत कठीण होते. त्यातच आता सुरू झालेल्या लग्नसराई, पार्टीला जाताना चेह-यावर मेकओवर कसा करावा हे जाणून घेऊ या... (summer beauty tips in Marathi)

हे देखील पाहा -

⦁ घराबाहेर पडताना सर्वप्रथम चेह-यावर (Face) बर्फ लावावा. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो व घामही कमी येतो.

⦁ उन्हाळ्यात चेह-यावर सतत तेलकटपणा तयार होतो. ह्या तेलकटपणापासून सुटका मिळवण्यासाठी व त्वचेतला ओलावा टिकवण्यासाठी घरातून बाहेर पडताना मॉश्चरायजरचा वापर करावा.

⦁ उन्हाळ्यात फाउंडेशनचा वापर शक्यतो टाळावा. बाजारात काही सनस्क्रिन मिळतात त्याचा वापर करावा. सनस्क्रिन लावण्यापूर्वी तुम्ही वापरत असलेल्या फेशवॉश किंवा सोपने चेहरा धुवावा.

⦁ सनस्क्रिन लावल्यानंतर चेह-याला चांगला प्राइमर लावावा त्यामुळे त्वचेवर एक चांगल्या प्रकारचा बेस तयार होईल. उन्हापासून त्वचेचे संरक्षण होईल.

summer beauty tips in Marathi, Makeover Tips in Marathi
Summer Tips : उन्हाळ्यात काकडी खाण्याचे फायदे असेही...

⦁ त्वचेवरचा तेलकटपणा घालवण्यासाठी बाजारात ब्लॉटिंग पेपर मिळतो त्याचा देखील वापर करु शकता.

⦁ उन्हातून ऑफिस (Office)मध्ये गेल्यावर चेह-याला पावडर लावू नका त्यामुळे चेहरा फुटतो. पावडरऐवजी स्प्रेचा वापर करा.

⦁ चेह-यावर गडद मेकअप करु नका. घामामुळे सतत चेहरा पुसल्यास चेह-यावर मेकअपचे पॅचेस राहतात. त्यासाठी वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्टचा वापर करा.

⦁ तुम्ही परिधान केलेल्या पोशाखाला अनुसरून तुम्ही मेकअप करायला हवा. त्याला साजेशी असे कानातले घालायला हवे.

⦁ पार्टीला (party) किंवा ऑफिसला जाताना मेकअप करत असला तर तो लाईट असायला हवा. जास्त गडद मेकअप केला तर तुमचे इम्प्रेशन नक्कीच सर्वांवर वाईट पडेल.

⦁ लिपस्टिक किंवा आयशॅडो लावताना त्वचेला शोभेल असा शेडचा वापर करावा.

अनेकदा घाम, ऊन आणि धुळीमुळे चेह-यावर मुरुमांची समस्या निर्माण होते. चेहऱ्यावर उन्हाळ्यात मेकअप केल्यानंतर तो तेलाने मालिश करून काढावा ज्यामुळे चेह-याला रॅशेस पडत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी ब्युटिशियन सोबत संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com