
Do You Cry Over Small Things : शरीरासोबत मन व्यस्त असणे सुद्धा गरजेचे असते. मनोरोग विशेषतज्ञ गगनदीप कौर यांनी काही मेंटल हेल्थ रिलेटेड प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जाणून घ्या का छोटया छोटया गोष्टींवरून सारखे रडायला येते.
तुम्हाला एखाद्या व्यक्तीला छोटया गोष्टींवर रडायला का येते, जर तुम्ही एखाद्या दुखः मध्ये असाल तर त्यामधून बाहेर कसे पडावे. अशातच एंटीडीप्रेसेंट कमी करण्यासाठी आणि तणावमुक्तीसाठी (Stress) काय करावे. जाणून घ्या एक्स्पर्टकडून माहिती.
प्रश्न : मी 21 वर्षाचा आहे. दीड वर्षापासून मी एंटीडीप्रेसेंट औषध घेत आहे आणि जेव्हा मी औषध घेणे बंद करतो तेव्हा घशामध्ये आणि दंडांमध्ये कंपन होऊ लागते. काय करायला हवे ?
उत्तर : जर तुम्हाला औषधे (Medicine) सोडायची असतील तर तुम्ही सोबतच थेरेपी घेतली पाहिजे. कोणतीही समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल या गोष्टीकडे फोकस करणे, नकारात्मक विचारांच्या पॅटर्नला ठीक करणे, सोबतच तुम्हाला तुमचा तणाव कमी करायचा आहे, अशातच तुम्ही तुमच्या स्किल्स डेव्हलप करू शकता, असं केल्याने हळूहळू तुमच्या औषधांवर निर्भरता कमी होईल आणि पुढे जाऊन तुम्हाला डिप्रेशनची समस्या होणार नाही.
प्रश्न : मागील काही दिवसांमध्ये मी, एगोराफोबिया बद्दल वाचले, मला असे वाटत आहे की ही समस्या मला सुद्धा आहे, घरामधून बाहेर निघाल्यावर असे वाटते की, मला चक्कर आली तर मी काय करू. अशा पद्धतीच्या घाबरण्यावर उपाय ?
उत्तर : एगोराफोबियाचा अर्थ म्हणजे, एक अशा प्रकारची स्थिती ज्यामधून बाहेर येणे कठीण होऊन जाते. अशावेळी चिंता, घाबरणे आणि चक्कर अशा समस्या उद्भवतात. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये फसाल. हा फोबिया बस, लिफ्ट, रेल, मेट्रो, फ्लाईट आणि गर्दीच्या ठिकाणी असल्यावर होऊ शकतो.
अशावेळी तुम्ही एखाद्या क्लिनिक सायकॉलॉजिस्टला भेटू शकता, जे तुम्हाला सांगू शकतील की या समस्येचं मूळ कारण नेमकं काय आहे आणि हे विचार सारखे सारखे उत्पन्न का होतात याबद्दल ते सांगतील. सीबीटी, सिस्टिमॅटिक डिसेंसीटायझेशन आणि एंग्जाइटी कमी करण्यासाठीच्या काही पद्धती असतात, ज्यामुळे एगोरागोबियापासून आराम मिळतो.
प्रश्न : मला छोट्या छोट्या गोष्टींवरून रडू येते. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा प्रभाव त्वरित माझ्या मनावर होतो. मला थेरीपीस्टला भेटावे लागेल का ?
उत्तर : छोट्या छोट्या गोष्टींवरून रडू येणे हे असे दर्शवते की, तुम्ही एखाद्या भावनात्मक गोष्टीमध्ये संवेदनशील आहात. तुम्हाला असे वाटते की लोक तुम्हाला स्वीकारणार नाहीत. अस ही असू शकते की तुम्ही भरपूर विचार करत आहात, आणि दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहात.
परंतु दुसऱ्याकडून तुमची अपेक्षा पूर्ण नाही झाली की तुम्ही स्वतः दुखी होता. अशावेळी स्वतःच्या भावना एक्सपोज न करणे, तुम्हाला कमजोर बनवू शकते. गरजेचं नाही की सर्वांनीच आपल्याला पसंत केले पाहिजे.
प्रश्न : चार महिन्यान आधी मी माझ्या एका जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. मी त्या दुःखामधून बाहेर येऊ शकत नाही आहे. मला रात्रीची झोप येत नाही. मी नोकरी सुद्धा करते परंतु माझं कामांमध्ये मन लागत नाही. काय करायला हवे ?
उत्तर : दुःखामधून बाहेर येण्याचा प्रत्येकाचा एक वेगळा झोण असतो. तुम्हाला चार महिन्यानंतर सुद्धा ही समस्या असेल तर, तुम्ही थेरीपीस्टला भेटा. कुठे ना कुठे तुम्ही हे स्वीकारू शकत नाही आहात. अशातच तुम्ही त्या व्यक्तीशी बोला, ज्यांनी स्वतःच्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. हळूहळू स्वतःला सांभाळत आपल्या डेली रुटीनकडे परत या.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.