
Health : तुम्ही घरी किंवा बाहेर फ्रुटस्टॉलवरील फळांचा आस्वाद घेत असाल. अर्थातच प्रत्येकाची फळे खाण्याची पध्दत वेगळी असावी. सर्व साधारणणे सध्या अनेक जण ज्यूस किंवा स्मूदीच्या माध्यमातुनच फळे खाणे पसंत करतात. काहींना फळे असेच खायला आवडतात. काही जण टरबूज खाताना मिठ लावतात, तसेच काही जण साखरसुद्धा लावतात.
जर कधी निरखून पाहिलं तर फळावर मिठ-मसाला किंवा साखर टाकल्यानंतर फळाला पाणी सुटते. हे न्यूट्रिशनल लॉसमुळे घडते. तर मिठ आणि चाट मसाल्यामधील सोडियम आरोग्यास अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकते.
1. वजन वाढणे -
फळं ही नैसर्गिकरीत्याच गोड असतात. त्यांच्यात योग्यत्या प्रमाणात ग्लुकोज असते, ज्यामुळे कॅलरी वाढते. अशात जर तुम्ही फळांमध्ये अजून साखर घातल्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर जास्त साखरेमुळे कॅलरी वाढण्याची शक्यता असल्यामुळे वजन वाढू शकते.
मधुमेही रुग्णांनी चुकूनही फळांवर मिठ (Salt) किंवा साखर घालून खाऊ नये. मिठ किंवा मसाल्यातील सोडियममुळे फक्त शरीरात पाण्याची पातळी वाढत नाही तर किडनीवरही त्याचा परीणाम होतो. जर तुम्ही किडनी स्टोनचे रुग्ण असाल तर फळांवर मिठ-मसाला आणि साखरेचा वापर करणे तुमच्या आरोग्यास घातक ठरु शकते.
2. पोषक तत्वांची कमतरता -
तस तर फळांना पोषकतत्वांच उत्तम साधन मानल जात. फळांच्या सेवनाने शरीराला विटॅमिन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी पोषक तत्वे मिळतात. फळांतून मिळणाऱ्या पोषकतत्वापासून फक्त शरीराचे वजन आटोक्यातच राहत नाही तर वजन कमी देखील होते.
पण जेव्हा तुम्ही फळांवर मिठ-मसाला लावता तेव्हा फळांतील नैसर्गिक पोषकतत्वांचा नाश होऊन फळ पूर्वी सारखे हेल्दी राहात नाही. त्याउलट फळे आहे तशी खाल्यास फळांतील पाणी निसरत नाही आणि फळातील पोषकतत्वे तशीच राहातात.
3. सुज वाढणे -
जर तुम्ही फळांना मिठ लावून खात असाल तर शरीरातील सूज वाढू शकते. फळांना मसाला लावल्याने वॉटर रिटेंशन (शरीराच्या पोकळीमध्ये द्रवपदार्थ किंवा स्राव असामान्यपणे टिकून राहणे.) समस्या उद्भवू शकते. यामुळे शरीर फुगते. कधी-कधी हाता-पायांना सुज येते अशा समस्येपासून वाचण्यासाठी फळांवर मिठाचा वापर करणे थांबवा.
4. फळ खाण्याची योग्य पध्दत -
फळे जरी आरोग्यासाठी गुणकारी असली तरी त्यांच्या सेवनाची एक पध्दत आहे. आयुर्वेदानुसार निरोगी आयुष्यासाठी एका वेळी एक फळ खाल्लं पाहिजे. कापलेल्या फळांवर मिळ-मसाला किंवा साखर टाकण्या ऐवजी उन्हाळ्यात वेलची किंवा काळी मिरी घालून खा, तसेच हिवाळ्यात दालचीनी किंवा लवंग पावडर घालून आस्वाद घेऊ शकता. या पध्दतीने फळे चवीष्ट देखील बनतील व आरोग्याला देखील हानी पोचणार नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.