Different Types of Coffee : कॉफी सिलेक्ट करताना तुमचा पण गोंधळ उडतो का ? जाणून घ्या त्याचे प्रकार

कॉफी पिऊन लोकांना एनर्जी मिळते तर काही लोक फक्त चवीसाठी कॉफी घेत असतात.
Different Types of Coffee
Different Types of CoffeeSaam Tv

Different Types of Coffee : कॉफीचे नाव जरी घेतलना तरी काही लोकांमध्ये एनर्जी येते. गर्लफ्रेंडसोबत डेटवर जाणं असो वा एखाद्या ऑफिशियल मीटिंगला जाणं असो,कोणत्याही एखाद्या गोष्टीवर डिस्कस करायचं असो. या सगळ्या वेळी आपल्या मदतीला धावून येते ती कॉफी... कॉफीचे घुटके रिचवत रिचवत एखाद्या गोष्टीव चर्चा करणं वा एखाद्याशी गप्पा मारणं हा अनुभव खरोखरच सुखद असतो.

लोकांना दिवसातून २/३ वेळा कॉफी पिण्याची सवई असते. कंटाळा आला की ही कॉफी सकाळी,दुपारी आणि संध्यकाळी आनंदाने प्यायली जाते. कॉफी पिऊन लोकांना एनर्जी मिळते तर काही लोक फक्त चवीसाठी कॉफी घेत असतात.

तसेच त्यातील बऱ्याच लोकांना कॉफी किती प्रकारची असते हे माहीत नसते. अनेकदा जेव्हा त्यांना विचारले जाते की कोणत्या टाईप ची कॉफी घेणार तेव्हा त्यांना समजत नाही तसेच कॅफे मध्ये गेल्यावर मेनू कार्ड बघून त्याचा नेहमी गोंधळ होतो नक्की कोणती कॉफी सिलेक्ट करायची समजून येते नाही.चला तर मग हा जाणून घेऊया कॉफी चे वेगवेगळे प्रकार.

Different Types of Coffee
Bullet Coffee : तुम्ही कधी तूप कॉफी प्यायली आहे का ? बॉलीवूडच्या अनेक नटी आहेत या कॉफीचे फॅन, नक्की ट्राय करुन पहा

1. एस्‍प्रेसो

ही सर्वांत हार्ड कॉफी असते,यात दुध आणि साखरेचा वापर केला जात नाही.ही जगभरात सर्वाधिक विकली जाते. या कॉफी ला ब्लॅक कॉफी सुद्धा बोलू शकतो.

coffee
coffee canva

2. अमेरिकानो

अमेरिकानो ही कॉफी हार्ड नसते.एस्‍प्रेसो कॉफी मध्ये गरम पाणी टाकून त्याची हार्डनेस कमी करतात. ज्यांना एस्‍प्रेसो हार्ड कॉफी पियायची नसते ते लोक अमेरिकानो ही कॉफी पितात.

3. कपॅचिनो

एस्‍प्रेसो मध्ये स्टीम दुध टाकून कपॅचिनो कॉफी बनवली जाते या कॉफी मध्ये फेस चे प्रमाण अधिक असते.एका कपामध्ये फोमयुक्त गरम दुध, एस्प्रेसो आणि स्टीम्ड दुध सारख्या प्रमाणात असते.

Coffee
Coffee canva

4. लाते

लाते या कॉफी मध्ये एस्‍प्रेसो,स्टीम दुध आणि फेस तिन्ही असते पण त्यामध्ये दुधाचे प्रमाण जास्त असते.

5. मोका

मोका कॉफी कपॅचिनो सारखीच असते.दुध,एस्‍प्रेसो आणि फेस याचे प्रमाण सारखेच असते त्यासोबतच चॉकलेटचा एक शॉट मिसळला जातो.काही लोक आवडी नुसार हॉट चॉकलेट सोबत कॉफी घेत असतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com