
Women Health Tips : जवळपास सर्वच महिलांना पीरियड्स क्रॅम्प्सचा त्रास होतो. पीरियड्स क्रॅम्प्स म्हणजेच पीरियड्स दरम्यान होणाऱ्या वेदना. पीरियड्स दरम्यान काही महिलांना तीव्र तर काही महिलांना कमी वेदना होतात.
बहुतेक स्त्रिया (Women) तक्रार करतात की पीरियड्स दरम्यान वेदना झाल्यामुळे त्यांच्या नियमित दिनचर्येवर परिणाम होतो. दोन दिवस त्यांना लहानसहान कामे करतानाही वेदना जाणवतात. त्याला आपल्या अनेक नियमित सवयी कारणीभूत आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुम्ही महिन्यातील पाच दिवस आरामात घालवू शकणार.
1. फळे आणि हिरव्या भाज्या
फळे आणि हिरव्या भाज्या निरोगी आरोग्यासाठी खूप फादेशीर आहेत. पचनासाठी आणि आतड्यांसाठी फळे / हिरव्या भाज्या खूप उपयुक्त आहे. तसेच पोटात होणारी जळजळ कमी करण्यास फळे / भाज्या सहकार्य करतात. मानसिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांचे सर्वात महत्वाचे म्हणजे जळजळ. त्यामुळे फळे / भाज्या खाल्याने आतड्यात निरोगी जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. ज्याने पोटाचे स्नायू शिथिल राहतात. त्यामुळे तज्ज्ञांनी हिरव्या पालेभाज्या भरपूर खाण्याचा सल्ला दिला आहे. दाहक-विरोधी गुणधर्म भाज्यांमध्ये असतात. जे पीरियड्स दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून (Pain) आराम मिळवण्यासाठी सहकार्य करतात.
2. कॉफीचे सेवन करू नका
बऱ्याच महिलांचे असे मत आहे की कॉफीचे सेवन केल्याने पीरियड्स दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळते. मात्र तज्ञांच्या मते, कॉफीच्या सेवनाने पीरियड्सपूर्वी आणि पीरियड्स दरम्यान वेदना होऊ शकतात. त्याचसोबत पीरियड्स दरम्यान तुमचा तणाव वाढतो आणि चिडचिड होते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान कॉफीचे (Coffee) सेवन टाळण्याचा प्रयत्न करा.
3. दुधही वेदनादायक असू शकते
मानसिक पाळी दरम्यान शक्यतो डेअरी प्रॉडक्ट घेणे टाळा. कारण यामुळे जळजळ होते. चांगल्या दर्जाच्या दुध शरीरातील अनावश्यक हार्मोन्सचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना तीव्र होतात. म्हणून अशा परिस्थितीत, तज्ञ मासिक वेदना टाळण्यासाठी दूध (Milk), दही, पनीर, चीज इत्यादी दुग्धजन्य पदार्थांपासून अंतर ठेवण्याचे सल्ला देतात.
4. अधिक ताण घेऊ नका
मासिक पाळी दरम्यान सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे मानसिक आरोग्य आनंदी राहणे. तज्ज्ञांच्या मते, पीरियड्स दरम्यान तुम्ही तणावमुक्त आणि कम्फर्टेबल राहा, त्यासोबतच श्वासोच्छवासाचे व्यायाम देखील करणे गरजेचे आहे. तणावमुक्त राहण्यासाठी तुमच्या आवडत्या कामात स्वतःला व्यस्त ठेवा आणि इतर मनोरंजनात्मक उपक्रम जसे की संगीत, चित्रपट इत्यादींमध्ये सहभागी व्हा आणि स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा.
5. आहारात हर्ब्सचा समावेश करा
वनस्पती औषधीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. तुमच्या आहारात आले दालचिनीचे पाणी, कॅमोमाईल चहा पेपरमिंट चहा, रास्पबेरी लीफ टी यांचा समावेश करा. त्यामुळे पीरियड्स दरम्यान ओटीपोटातील जळजळ कमी होते. त्यासोबतच अंतर्गत स्नायूंना आराम मिळते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.