
Stomach Pain : झोपताना प्रत्येक व्यक्तीची पोझिशन वेगवेगळी असते. अनेक लोकांच संबंध आहे की, त्यांना पोटावर झोपून आराम मिळतो. जरी तुम्हाला ही पोझिशन आरामदायी वाटत असली तरी. अशा पोझिशनमध्ये झोपल्यावर तुम्हाला दीर्घकाळासाठी नुकसान होऊ शकते.
यापासून वाचण्यासाठी तुम्हाला योग्य पोझिशनमध्ये झोपणे अत्यंत गरजेचे आहे. एक्सपर्ट या गोष्टीबद्दल सांगतात की, पोटावर झोपल्याने शरीरामधील अंतरीक अंगावरती दबाव पडतो. ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे दुखणे (Pain) वाढतात. जाणून घेऊया शरीराला नुकसान कसे होते.
1. झोपेमध्ये होतात या गोष्टी :
तुम्हाला पोटावरती झोपून फ्लेक्स वाटत असेल. परंतु अशा स्थितीमध्ये झोपणे हे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. एक्सपर्ट सांगतायेत की, पोटावरती झोपल्याने रीढचे हाड स्थिर राहत नाही. पूर्ण वजन शरीराच्या मध्यभागी येते. रीढच्या हाडाला योग्य पोझिशन न मिळाल्याने शरीरामधील वेगवेगळ्या अंगांना दुखणे उद्भवते.
2. मान आणि खांद्यांमध्ये दुखू लागते :
पोटावरती झोपल्याने खांदे आणि मान पूर्णपणे रिलॅक्स नाही करू शकत. ज्यामुळे मानेच्या मासपेशींमध्ये ओढताना होऊ शकते. हेल्थ एक्सपर्टचं म्हणणं आहे की, पोटावरती झोपल्याने सनक निघते आणि हात पाय सुन्न पडणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. जर पूर्ण रात्र पोटावरती झोपले गेले तर, काही अंग निष्क्रिय होऊन जातात.
3. गर्भावस्थेमध्ये अजिबात झोपू नका :
ज्या महिला प्रेग्नेंट असतात त्यांनी पोटावरती अजिबात झोपू नये. पोटावरती झोपणे हे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बाळासाठी अतिशय हानिकारक ठरते. त्याचबरोबर अनेक सर्जरींमध्ये पोटावरती झोपल्याने आपले नुकसान होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.