Thyroid Problem : तुम्हालाही थायरॉईडची समस्या आहे ? 'या' 5 प्रकारचे तेल ठरेल फायदेशीर !

गळ्याच्या आत खालील बाजूस एक लहान ग्रंथी असते त्यातून मिळणारे हार्मोन्स आपल्याला शरीरासाठी महत्वाचे असतात
Thyroid Problem
Thyroid Problem Saam Tv

Thyroid Problem : महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण जास्त दिसून येते. त्या तुलनेत पुरुषांची संख्या कमी आहे. गळ्याच्या आत खालील बाजूस एक लहान ग्रंथी असते त्यातून मिळणारे हार्मोन्स आपल्याला शरीरासाठी महत्वाचे असतात त्यामुळे थायरॉईड व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम पूर्ण बॉडी वर होत असतो. अनियमित आयोडीनची कमी,मधुमेह या कारणामुळे थायरॉईडची समस्या निर्माण होते.

Thyroid Problem
Thyroid : थायरॉईड नियंत्रीत ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात करा

थायरॉईडची लक्षणे

  • झोप कमी होणे

  • वजन कमी होणे

  • वजन वाढणे

  • अनियमित मानसिक पाळी

  • डोळे जळजळणे

  • घशातून कर्कश आवाज होणे

  • थंडी आणि गर्मी सहन न होणे

  • थकवा,चिडचिड होणे

थायरॉईडपासून सुटका हवी असेल तर या तेलांचा वापर करा

1. चंदन तेल

sandalwood oil
sandalwood oilcanva

चंदनचा वापर अनेक गोष्टी केला जातो त्वचेच्या समस्यासाठी, सुगंधी अत्तरसाठी,औषधीसाठी (Medicine) करण्यात येतो.चंदनच्या तेलात एंटी-एंग्जायटी सारखेच गुणतत्वे असतात त्यामुळे ओवरएक्टिव थायरॉईड संबधित स्ट्रेस (Stress) सारख्या समस्यांसाठी हे तेल फायदेमंद आहे.

2. काळी मिरीचे तेल

black pepper oil
black pepper oil canva

काळीमिरी चे तेल बूस्टर म्हणून काम करते.अंगावरील सुजन, चिंता,तणाव साठी हे तेल महत्त्वाचे काम करते.अनियमित थायरॉईडच्या इतर समस्यांसाठी हे तेल आवश्यक आहे या तेलाचा उपयोग केल्याने गोळ्या घेण्याची सुद्धा गरज नाही असे म्हणता येईल पण थायरॉईड खूपच वाढला असेल तर डॉक्टरांकडून (Doctor) तपासून घ्या.

Thyroid Problem
Thyroid Cancer : तरुणांमध्ये वाढतो आहे थायरॉईड कर्करोगाचा आजार, वेळीच सावध व्हा !

3. पुदिना ऑइल

peppermint oil
peppermint oil canva

पुदिनाचे तेल अनेक समस्यांवर काम करते.थायरॉईड मध्ये येणारी कमजोरी, मूड स्विंगस यापासून पुदिना तेल लावल्यावर आराम मिळतो.

4. लेव्हेंडर तेल

lavender oil
lavender oil canva

या तेलाचा उपयोग दुःखण्याचा त्रास कमी करण्यासाठी होतो.थायरॉईड मध्ये होणारे डिप्रेशन (Depression) यासाठी हे तेल रामबाण उपाय आहे.थायरॉईड असलेल्या लोकांन मध्ये हे नॉर्मली होत असते.

5. लेमनग्रासचे तेल

lemongrass oil
lemongrass oil canva

प्रो-इंफ्लेमेटरी साइटोकिन्सला थांबण्याचे काम लेमनग्रासचे तेल करत असते.त्यामुळे अनियमित थायरॉईड संबधित सुजन, एनर्जी सारखया समस्या असल्यास लेमंग्रास तेल फायदेमंद असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com