Negative Thoughts : मनामध्ये सतत नकारात्मक विचार येतात ? 'या' 5 टिप्स फॉलो करा, माईंड होईल फ्रेश !

Negative Thoughts Bothering You How To Respond : तुम्ही एखादं काम करत असाल किंवा एखादं नवीन काम हातामध्ये घेणार असाल तर...
Negative Thoughts
Negative ThoughtsSaam Tv

Negative Thinking Disorder : तुमच्या डोक्यात आणि तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येत आहेत का ? तुम्ही एखादं काम करत असाल किंवा एखादं नवीन काम हातामध्ये घेणार असाल तर, ते काम व्यवस्थित होईल की नाही असे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतात का ? जर तुमचं उत्तर हा असेल तर, तुम्ही सतत नकारात्मक विचार करून तुमच्या मानसिक स्थितीला कमकुवत करत आहात

व्यक्तीचे वाईट विचार त्याला पुढे जाण्यापासून थांबवतात. यामुळे तुमच्या आत्मविश्वास कमी होईल. स्ट्रेस आणि डिप्रेशनसारख्या समस्यांमुळे तुम्ही आणखीन खचून जाऊ शकता. बरेचदा असं होतं की, एकाच वेळेला भरपूर साऱ्या समस्या जीवनामध्ये येतात. अशावेळी मनात असलं तरी पॉझिटिव्ह (Positve) विचार करता येत नाही.

Negative Thoughts
Personality Development : पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी क्लासेस लावताय ? त्याआधी जाणून घ्या काही खास टिप्स

मनामध्ये सतत निगेटिव्ह (Negative) विचारचं येत राहतात. जर तुम्हाला पुढे जायचं असेल आणि प्रत्येक संकटावर मात करून विजय मिळवायचा असेल तर, तुम्हाला नकारात्मक विचार स्वतःच्या डोक्यामधून काढणे अत्यंत गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला डोक्यातून नकारात्मक विचार कसे दूर करायचे याबद्दल पाच टिप्स सांगणार.

1. मेडिटेशन करणे सुरू करा :

जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत असाल तर, त्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होऊ शकतो. यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठून मेडिटेशन करणे अत्यंत गरजेचे आहे. मेडिटेशन केल्याने मन एकाग्र होत आणि त्यामुळे तुमच्या अंगामध्ये आणि मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. ध्यान लावल्यानंतर बाहेरच्या नकारात्मक गोष्टी तुम्हाला सतवनार नाही. मेडिटेशनमुळे तुम्ही स्वतःला स्ट्रेस फ्री ठेवू शकता.

Negative Thoughts
Success Mantra: Karma Is Back ! यश प्राप्तीसाठी 'या' 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

2. नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तींसोबत राहू नये :

अनेक व्यक्ती अशा असतात ज्या स्वतः नकारात्मक विचार करतात आणि आसपास असलेल्या लोकांच्या मनामध्ये देखील निगेटिव्हिटी पसरवण्याचे काम करतात. जर तुम्ही सुद्धा अशाच निगेटिव्ह पर्सन सोबत राहत असाल तर, तुमचे माईल सुद्धा निगेटिव्ह विचार करू लागेल. त्यामुळे अशा व्यक्तींपासून लांब राहा. सोबतच ज्या व्यक्तींचे विचार पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यासोबत तुम्ही मैत्री (Friends) ठेवा.

3. प्रोत्साहित करणारी पुस्तके वाचा :

चांगली पुस्तके (Books) वाचून सुद्धा तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या निगेटिव्हिटीला दूर करू शकता. तुम्ही अशी पुस्तके वाचा जी जीवनाबद्दल सकारात्मक फायद्यांविषयी माहिती देत असेल. सोबतच तुम्ही प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींची पुस्तके वाचू शकता.

Negative Thoughts
Chanaky Niti : चाणक्याचे 'हे' शब्द पाळा, जीवनात फसवणूक कधीच होणार नाही!

4. हसत खेळत राहणे गरजेचे आहे :

पूर्ण दिवस उदास राहण्यारवजी हसत रहा. वाईट गोष्टींचा विचार करत राहिल्याने तुमच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत राहतील. यापासून वाचण्यासाठी तुम्ही असं काहीतरी करा जेणेकरून तुमचे हसणे पुन्हा परत येईल. अशातच तुम्ही लाफ्टर थेरेपी सुद्धा घेऊ शकता. सकाळी उठल्यानंतर पाच मिनिटे जोर जोरात हसा. त्याचबरोबर कॉमेडी फिल्म पहा आणि कॉमेडी जोक्स आणि सिरीयल देखील बघा.

5. हॉबी फॉलो करा :

जर तुम्ही एकटे राहत असाल आणि तुमच्या मनात वारंवार नकारात्मक विचार येत असतील तर, तुम्ही ती गोष्ट करा जी केल्याने तुम्हाला दिलासा मिळेल. डान्सिंग, पेंटिंग, सिंगिंग, ट्रॅव्हलिंग जे तुम्हाला करून आनंद आणि सॅटिस्फॅक्शन मिळत असेल ते तुम्ही करा. असं करत राहिल्याने तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येणार नाहीत. सोबतच तुमचा मूड देखील चांगला राहील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com