Weight Loss Tips : ग्रीन कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Green Coffee benefits for weight loss : कमी करण्यासाठी लोक ग्रीन कॉफीला अधिक पसंती देत आहेत. 
Weight Loss Tips
Weight Loss TipsSaam Tv

Green Coffee Benefits : ग्रीन कॉफी पिण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षात लोकांमध्ये अधिक  वाढलेला आहे.  खासकरून वजन कमी करण्यासाठी लोक ग्रीन कॉफीला अधिक पसंती देत आहेत.  कच्च्या कॉफी बीन्सपासून ग्रीन कॉफी बनवली जाते आणि या ग्रीन कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड असते. जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. 

ग्रीन कॉफीमध्ये असणाऱ्या क्लोरोजेनिक ऍसिडमुळे, अनेक लोक दिवसभरातून खूप वेळा ग्रीन कॉफीचे सेवन करतात. ज्यामुळे वजन कमी करता येते.  10 पैकी 9 जणांचे असे म्हणणे आहे की त्यांनी मित्राचा सल्ला, टीव्हीवरील जाहिरात किंवा ऑनलाइन व्हिडिओ पाहिल्यामुळे ग्रीन कॉफी (Coffee) पिण्यास सुरुवात केली.

Weight Loss Tips
Different Types of Coffee : कॉफी सिलेक्ट करताना तुमचा पण गोंधळ उडतो का ? जाणून घ्या त्याचे प्रकार

त्यामुळे वजन कमी होते असे त्यांचे म्हणणे आहे.  पण खरच ग्रीन कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी  डायटिशियन पूजा सिंग यांचे काय म्हणणे आहे ते पाहू.

1. ग्रीन कॉफी वजन कमी करण्यासाठी सहकार्य करते का?

डायटिशियन पूजा सिंग यांच्या मते, आरोग्यासाठी फायदेशीर जीवनसत्वे आणि खनिजे ग्रीन कॉफी बीन्समध्ये उपलब्ध असतात. त्यासोबतच ग्रीन कॉफीमध्ये उपलब्ध असलेले क्लोरोजेनिक ऍसिडचे प्रमाण शरीरातील चरबी कमी करण्यास सहकार्य करते. परिणामी वजन कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्ही ठराविक प्रमाणात नियमितपणे ग्रीन कॉफीचे सेवन केल्याने वजन कमी (Weight Loss) होण्यास मदत होते. असे आहारतज्ञांचे म्हणणे आहे.

Weight Loss Tips
Green Gram Benefits : हरभऱ्याचे करा नियमित सेवन, मधुमेहापासून ते कोलेस्ट्रॉलपर्यंत सर्व समस्या होतील दूर !

2. वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफी कधी प्यावी

वाढते वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन कॉफी पिणे गरजेचे आहे.   त्यासोबतच तुम्ही दुपारी आणि संध्याकाळीही ग्रीन कॉफीचे सेवन करू शकता. परंतु लक्षात ठेवा की, ग्रीन कॉफी प्यायलानंतर १ तासापर्यंत तुम्हाला काहीही खायचे नाही. जर तुम्ही काही खाल्ले तर वजन कमी होण्याचे सकारात्मक परिणाम अजिबात दिसणार नाही.

3. ग्रीन कॉफी पिताना घ्यावयाची काळजी

ग्रीन कॉफीचे सेवन करून केवळ वजनच कमी नाही करत तर आरोग्याला देखील इतर फायदे होतात. मात्र जर ग्रीन कॉफीचे सेवन भरपूर प्रमाणात केले तर शरीरातील ब्लड शुगर लेव्हल कमी होऊ शकते.  ब्लड शुगर (Sugar) लेव्हल खूपच कमी झाल्याने आरोग्यासंबधित समस्यांचा सामना करावा लागतो.  त्यामुळे आहारतज्ञांच्या मते, २ कपपेक्षा जास्त ग्रीन कॉफी एका दिवसात पिऊ नये.

Weight Loss Tips
Weight Loss Tips : झपाट्याने वजन कमी करायचे असेल तर, नाश्तासोबत सामील करा या स्मुदी

4. ग्रीन कॉफीसोबत या गोष्टीही आवश्यक आहेत

आहारतज्ज्ञांच्या मते केवळ ग्रीन कॉफीचे सेवन करून वजन कमी करता येत नाही. तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफी सोबतच नियमित आहार, व्यायम, शारीरीक हालचाली वाढवणे या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. डायटिशियन पूजा सिंग यांच्या मते, वजन कमी कण्यासाठी सकाळी उठून ग्रीन कॉफीसह व्यायाम किंवा योगासने करणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुमच्या आहारातही बद्दल करणे आवश्यक आहे, तरच तुम्ही वजन कमी करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com