Puri Frying Tips : पुरी तळताना अधिक तेल शोषते? टम फुगत नाही, मग 'या' टिप्स फॉलो करा

लहान मुलांना घेऊन ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वच लोकांना पुरी अतिशय आवडते.
Puri Frying Tips
Puri Frying TipsSaam Tv

Puri Frying Tips : आपण घरात बनवणारी पुरी भाजीसोबत, छोल्यासोबत, चटणी सोबत किंवा लोणच्यासोबत सगळ्या सोबत आनंदाने खातो. लहान मुलांना घेऊन ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वच लोकांना पुरी अतिशय आवडते. म्हणून आज प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पुरी बनवून खाल्ली जाते.

काही जागांवर तिला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तिची चव देखील वेगळी असते. अनेक भारतीय (India) लोकांच्या घरामध्ये सकाळी नाश्त्यासाठी हलवा पुरी बनवण्याची पारंपारिक पद्धत आहे.

परंतु अडचण या गोष्टीची आहे की अनेक वेळा पुरीला व्यवस्थित बनवून सुद्धा ती फुगत नाही. सोबतच चवीला देखील चांगली लागत नाही. खरंतर पुरी बनवताना आणि पुरी तळताना देखील आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. असं केल्याने तुमची पुरी अगदी परफेक्ट बनेल. एवढी परफेक्ट बनेल की कोणी पण खाल्ल्यावर तुमचं कौतुक करेल. चला तर मग जाणून घेऊ पुरी व्यवस्थित तळायची कशी.

1. तेलाच्या तापमानावर लक्ष ठेवा :

पुरी तळण्यासाठी तेलाचे तापमान चेक करणे अतिशय गरजेचे असते. लक्षात ठेवा की तेल जास्त गरम नसले पाहिजे आणि जास्त थंडही नसले पाहिजे. कारण कमी गॅसवर पुरी तळल्याने पुरीमध्ये तेल भरते. जर तुम्ही जास्त गरम तेलामध्ये पुरी फ्राय करणार, तर तुमची पुरी वरून काळी आणि आतमधून कच्ची राहील. त्यामुळे पुरी फ्राय करताना तळण्याआधी तेल व्यवस्थित गरम करून घ्या. त्यानंतर मिडीयम फेल्म ठेवून पुरी व्यवस्थित तळा.

2. कमी तेलामध्ये पुरी कशी तळावी :

जर तुमच्या पुरीमध्ये नेहमीच तेल भरते, तर काही टेक्निक वापरून या अडचणी पासून सुटकारा मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला पिठावरती लक्ष द्यायला हवे. तुम्हाला पिठाला जास्त टाईट किंवा हलके मळण्यापासून वाचायचे आहे. सोबतच पिठाचा वापर करताना लगबग 15 मिनिटे आधी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर तळण्यासाठी पुरी तयार करून घ्यायची आहे.

Puri frying tips
Puri frying tipscanva

3. हे काम सुद्धा करा :

जेव्हा पुरी फ्राय करता, तेव्हा तेलामध्ये थोडंसं मीठ टाका. ही टीप तुमचं काम अतिशय सोप करेल. असं म्हटलं जातं की मीठ टाकल्याने पुरी आपल्या आतमध्ये कमी प्रमाणात तेल (Oil) शोषून घेते आणि चांगल्या प्रकारे तळून निघते. परंतु तेलामध्ये जास्त प्रमाणात देखील मीठ टाकू नये. नाहीतर तुमचे मीठ जळून जाईल आणि तुमची पुरी देखील जास्त नमकीन होईल. तुम्ही एक ते दोन चमचे मीठ वापरू शकता.

4. पुरी क्रिस्पी बनवण्यासाठी काय कराल ?

यासाठी तुम्ही पुरीमध्ये रवा वापरा. रव्याचा वापराने तुमची पुरी क्रिस्पी बनेल. या टिप्समुळे (Tips) पुरी तेलाला कमी प्रमाणात शोषून घेईल. त्याचबरोबर पुरी चविष्ट देखील बनेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com