
अनेकांची आवडती आणि सहज सोपी अशी सर्च इंजिन साइट्स गुगल. गुगलचा वापर हा सर्च इंजिनसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक करतात. सध्या इंटरनेट ही आपल्या अनेकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गोष्टी आहे.
जगाच्या पाठीवर कोणत्याही गोष्टीबद्दल सविस्तर माहीती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. सध्या वाढतं जाणार डिजिटायझेशनमुळे इंटरनेटचा वापर हा अधिक प्रमाणात केला जातो. कधी कधी गुगलवर सर्च केलेल्या गोष्टींमुळे आपले बँक खाते रिकामे होऊ शकते. ज्यामुळे आपण मोठ्या संकंटात सापडू शकतो.
बरेचदा ब्राउझरचा वापर करुन आपण अनेक सोशल साइट्सवर लॉग इन करतो. ज्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया त्या ७ चुकांबद्दल
1. सेफ वेबसाइटस
कोणत्याही वेबसाइटला (Website) भेट देताना ती सेफ आहे का हे पाहा तसेच त्या साइटला तुमचा वैयक्तिक डेटा शेअर करताना त्याची विशेष काळजी घ्या. यासाठी ओपन केलेल्या साइटचे URL तपासा. ती साइट https:// वेबसाइटवर जात असेल तर तिला सुरक्षित मानली जाते.
2. स्ट्राँग पासवर्ड:
कोणत्याही महत्त्वाच्या वेबसाइट किंवा बँकेचे (Bank) पासवर्ड हे स्ट्राँग असायला हवे. पासवर्ड असा सेट करा जो कोणालाही हॅक करता येणार नाही. यामध्ये काही प्रमाणात नंबर, अक्षरांचा समावेश करा.
3. पॉप-अपकडे दुर्लक्ष करा:
अनेकदा आपल्याला काही साइट्सवरुन पॉपचे मेसेज येतात. अशावेळी त्यावर क्लिक करण्यासाठी लिंकही दिली जाते. अशा पॉप-अपकडे दुर्लक्ष करा. अनेकवेळा हा मेसेज अज्ञात व्यक्तीकडून येतो. ज्यामुळे आपला फोन (Phone) हॅक होण्याची समस्या अधिक असते.
4. वैयक्तिक माहिती शेअर करू नका:
कोणतीही वैयक्तिक माहिती इंटरनेटवर शेअर करु नका. असे केल्याने तुमचा वैयक्तिक डेटा चोरला जाऊ शकतो. ज्यामुळे बँक खाते रिकामं होऊ शकते.
5. ब्राउझर अपडेट ठेवा:
जर तुम्ही सतत इंटरनेटवर काही सर्च करत असाल तर ब्राउझर नेहमी अपडेट ठेवा. यामुळे डिव्हाइसमध्ये व्हायरस येण्याचा धोका दूर होतो.
6. फाईल डाउनलोड करताना:
कोणतीही फाईल न तपासता डाउनलोड करु नका. तसेच कोणत्याही वेबसाइटवरील कुकीजवर क्लिक करु नका. यामुळे तुमच्या संपूर्ण फोनवर नजर ठेवली जाईल.
7. व्हीपीएन आणि पब्लिक वाय-फाय:
अनेकदा प्लॅटफॉर्म किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याला फ्रीमध्ये वायफायज व्हीपीएन मिळतो. बरेचदा आपण त्याचा लाभ ही घेतो परंतु, यामुळे आपला फोन हॅक होण्याची सगळ्यात जास्त धोका असतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.