Parenting Tips : मुलांच्या बाबतीत निर्णय घेताना या चुका करु नका

पालकांना मुलांच्या प्रत्येक कृतीवर प्रतिक्रिया देण्याची सवय झाली आहे.
Parenting tips in Marathi,
Parenting tips in Marathi,ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुलं लहान असली की, ते आपल्या पालकांकडून शिकत असतात. वाढत्या वयात मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लावणे हे पालकांचे काम असते. परंतु, मुले घरात असताना पालकांची चिंता अधिक वाढत जाते. मुलांना योग्य त्या वयात योग्य ती जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. मुलांना योग्य कामाची सवय लावा, सवयी लावताना त्यांना समजवून सांगा. त्यांना ओरडून सांगितल्यास ते हट्टी बनतील. अगदी बालवयापासून त्यांना स्वतःची कामे करण्याची सवय लावा. त्यांना काम करताना आत्मविश्वास द्या. पालकांची (Parents) मुलांसोबत वागण्याची आणि बोलण्याची शैली तपासून पहा. मुलांना (Child) स्वतःची कामे करण्याची सवय कशी लावावी अशावेळी कोणत्या चुका टाळ्याला हव्या याविषयी आम्ही टिप्स (Tips) देणार आहोत.

हे देखील पहा -

या चुका पालकांनी टाळ्याला हव्या -

१. अनेकवेळा आपण मुलांच्या बाबतीत काही निर्णय घेतो. मुलांशी संबंधित निर्णय घेताना पालक मुलांकडे दुर्लक्ष करतात असे मुलांना वाटू लागते. मुलांबाबतीतचा निर्णय घेताना पालक मुलांना गृहीत धरू लागतात. त्यामुळे मुलांची चिडचिड होऊ लागते. मुलं योग्य वयात आली की, त्यांना त्यांच्या बाबतीतचे निर्णय घेताना सामील करा. त्यांना वाटत असणाऱ्या गोष्टी किती योग्य आहेत हे पटवून द्या. त्यांच्या निर्णयाचा आदर करा.

Parenting tips in Marathi,
Kitchen tips : ग्राइंडर स्वच्छ करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

२. मुलांना जबाबदारी देताना त्यांच्या योग्यतेची पातळी लक्षात ठेवा. कोणतेही अवघड काम देताना पालकांनी त्यांच्या आजूबाजूलाच राहून त्यांचे निरीक्षण करा. त्यांच्या वयाबरोबरच त्यांना योग्य शिकवण देणे अधिक गरजेचे आहे.

३. मुलं पालकांचे निरक्षण करून त्याप्रमाणे वागू लागतात. त्यासाठी मुलांसमोर वागतांना भान ठेवा. संपूर्ण कुटुंबाने बसून त्यांच्याशी चर्चा करा. एका दिवसात किंवा आठवड्यात करायच्या सर्व कामांची यादी मुलांना दाखवा. आणि त्यांनाही या कामात सहभागी करून घ्या.

४. घरात मुले असली की, त्या घरात वस्तू इकडे तिकडे पसरलेल्या असतात. मुले खेळून वस्तू योग्य ठिकाणी ठेवत नाहीत, अशा छोट्या गोष्टी न केल्याने मुलांवर आपली चिडचिड होणे स्वाभाविक आहे. आपण जर प्रत्येक गोष्टींसाठी मुलांवर चिडत करत असू, तर ते योग्य नाही. त्यांना योग्य वेळी समज देऊन काम करुन घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com