अशी राखा फ्रीजची काळजी; येणार नाही अन्नपदार्थांचा वास

फ्रीजमधून अन्नपदार्थांचा वास येतोय तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा.
how to get rid smell of food your fridge, Fridge Cleaning Tips in Marathi, home cleaning tips
how to get rid smell of food your fridge, Fridge Cleaning Tips in Marathi, home cleaning tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हल्ली प्रत्येकांच्या घरी अन्न (Food)सुरक्षित ठेवण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करतो. उन्हाळ्यात अतिउष्णतेमुळे अन्न फ्रिजमध्ये बाहेर ठेवले नाही तर सकाळची भाजी संध्याकाळपर्यंत खराब होते. फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नपदार्थांचा वास येऊ लागतो. नॉन व्हेजसारखे पदार्थ जेव्हा सेव्ह करून फ्रीजमध्ये ठेवले तर दुसऱ्या दिवशी फ्रीजमधून वास येऊ लागतो. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर वस्तूंमधूनही नॉन व्हेजचा वास येतो. अशा स्थितीत इतर पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स (Tips) सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही फ्रीजमधून येणाऱ्या वासापासून सुटका मिळवू शकता. (Fridge Cleaning Tips in Marathi)

हे देखील पहा -

अन्नपदार्थांचा वास काढण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वातआधी फ्रीजमधील सर्व वस्तू बाहेर काढा. असे केल्याने फ्रीज साफ करणे सोपे जाईल. त्याच वेळी, रेफ्रिजरेटरचे बटन बंद करा. ज्यामुळे विजेचा झटका येण्याची शक्यता नाहीशी होईल.

अन्नपदार्थांच्या वासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही या गोष्टी करू शकता.

- फ्रीजमधून अन्नपदार्थांचा वास काढून टाकण्यासाठी तुम्ही हायड्रोजन पेरोक्साइड वापरू शकता. हायड्रोजन पेरोक्साइड हा बुरशी काढण्यासाठी वापरला जातो. त्याचा वापर करून अन्नपदार्थांचा वास सहज काढता येतो. त्याच्या वापरासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड २ लिटर पाण्यात टाकून फ्रिजमध्ये स्प्रे करावे आणि काही वेळाने संपूर्ण फ्रीज स्वच्छ कापडाने पुसून थोडावेळ उघडे ठेवावे. असे केल्याने फ्रीजमधून अन्नपदार्थांचा वास पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल.

- अन्नपदार्थांचा वासापासून मुक्त होण्यासाठी व्हाईट व्हिनेगरचा वापर करु शकता. पांढऱ्या व्हिनेगरच्या वापराने अन्नपदार्थांचा वास काही मिनिटांत पूर्णपणे निघून जातो. रेफ्रिजरेटरमध्ये पांढरे व्हिनेगर स्प्रे करा आणि सुमारे १० ते १५ मिनिटानंतर संपूर्ण फ्रीज पाण्याने स्वच्छ करा.

- अन्नपदार्थांचा वासापासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा टाकून फ्रिजमध्ये स्प्रे करा. काही वेळानंतर स्वच्छ कापडाने फ्रीज पूर्णपणे पुसून टाका

- तसेच लिंबाचा रस आणि कोमट पाण्याचे (Water) मिश्रण खूप फायदेशीर आहे. पाण्यात लिंबाचा रस घालून या पाण्यात स्वच्छ कापड भिजवा. यानंतर या कपड्याने फ्रीज नीट पुसून घ्या. फ्रीज १५ मिनिटे उघडे ठेवा. असे केल्याने फ्रीजमधून येणारा अन्नपदार्थाचा वास पूर्णपणे निघून जाईल.

अशाप्रकारे तुम्ही फ्रिजमधून अन्नपदार्थांचा वास घालवू शकता.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com