Sperm Count Increase : स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी लसणाचे पाणी प्या, जाणून घ्या फायदे

लसणासारख्या घटकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे अन्नाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
Sperm Count Increase
Sperm Count Increase Saam Tv

Sperm Count Increase : लसणासारख्या घटकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे अन्नाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. लसूण पाणी दररोज प्यायल्यास, शुक्राणूंची संख्या वाढविण्यासह अनेक आरोग्य (Health) फायदे आढळू शकतात.

लसूण आरोग्यासाठी तसेच अन्नाची चव वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. येथे तुम्हाला लसणाचे (Garlic) पाणी पिण्याचे फायदे आणि त्यातून शुक्राणूंची संख्या वाढवण्यासह अनेक फायदे पाहूयात.

Sperm Count Increase
Garlic Water Benefits : रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या लसणाचे पाणी, आरोग्याला होतील अनेक फायदे !

एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, लसणामध्ये असे घटक असतात जे कर्करोगाचा धोका कमी करू शकतात. रोज लसणाची कळी पाण्याबरोबर गिळली तर भविष्यात कॅन्सरचा धोका कमी होतो, असं म्हटलं जातं. मात्र, त्याचे पाणीही या बाबतीत फायदेशीर ठरते.

हेल्थ वेबसाइट पबमेडने म्हटले आहे की, लसणाच्या गुणधर्मांमुळे पुरुषांची वडील होण्याची क्षमता वाढू शकते. त्याचे पाणी दररोज प्यायल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. हे वंध्यत्व आपल्यापासून दूर ठेवू शकते.

Sperm Count Increase
Garlic And Ginger Paste : आलं-लसूण पेस्ट साठवायची आहे ? तर 'या' टिप्स फॉलो करा

लसणाचे पाणी पचनसंस्था मजबूत करू शकतं, असं अनेक संशोधनानंतर समोर आलं आहे. हिवाळ्यात लसणाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या अनेक समस्या टाळता येतात.

हृदयाच्या आरोग्यासाठीही लसणाचे पाणी चांगले आहे, कारण ते रक्त पातळ करण्यासाठी उपयुक्त आहे हे तुम्हाला माहित आहे का? लसूण खराब कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास देखील उपयुक्त आहे, जे हृदयरोगाचे कारण मानले जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com