पॉवरहाऊस असणाऱ्या मोसंबीचा ज्यूस प्या आणि पाचनशक्ती वाढवा..!

आरोग्याला फायदेशीर असणारी मोसंबी.
पॉवरहाऊस असणाऱ्या मोसंबीचा ज्यूस प्या आणि पाचनशक्ती वाढवा..!
Sweet lemon juice information in marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लिंबू, संत्रीनंतर लिंबूवर्गीय फळांच्या सेवनाबद्दल बोलायचे झाले तर लोकांना मोसंबी खायला सर्वाधिक आवडते. मोसंबीची चव आंबट-गोड असते, त्यात अनेक पोषक तत्वांचा खजिना असतो. बहुतेक लोकांना मोसंबीचा रस प्यायला आवडतो, कारण त्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. यामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यात अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडंट, अँटीबैक्टीरियल, अँटीडायबेटिक गुणधर्मांचे पॉवरहाऊस आहे. (Sweet lemon juice information in marathi)

हे देखील पहा -

तसेच कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-६, थायामिन, लोह, फायबर, झिंक, पोटॅशियम, कॉपर, फोलेट आदी आपल्याला मोसंबी मधून मिळतात.

मोसंबीचा रस पिण्याचे फायदे

१. भूक वाढते-

मोसंबी हे फळ खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने भूक न लागण्याची समस्या दूर होते. ज्या लोकांना एनोरेक्सियाची समस्या आहे त्यांनीही मोसंबीचा रस प्यावा. शरीराचे वजन जास्त कमी झाल्यामुळे एनोरेक्सिया होतो. मोसंबीचे नियमित सेवन केल्याने लाळ ग्रंथी उत्तेजित होतात, ज्यामुळे अन्नाला (Food) चव येते व आपल्याला खाण्याची इच्छा निर्माण होते.

२. मळमळ-उलट्या थांबवण्यासाठी -

अनेक कारणांमुळे मळमळ, उलट्या अशा समस्या होऊ लागतात. विशेषतः, गर्भधारणा, अपचन, हार्मोनल असंतुलन, महत्वाच्या अवयवांच्या समस्यांमुळे उलट्या किंवा मळमळ देखील होते. अशा स्थितीत मोसंबी खाल्ल्यास किंवा त्याचा रस प्यायल्याने मळमळ आणि उलट्यांपासून आराम मिळतो, कारण त्याच्या चवीमुळे उलट्या किंवा मळमळ कमी होण्यास मदत होते.

Sweet lemon juice information in marathi
वाईट बातमी! 'ही' सरकारी बँक संकटात; शेकडो शाखा बंद करणार, जाणून घ्या कारण

३. स्कर्वीपासून संरक्षण करा -

स्कर्वी हा आजार शरीरात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो. जास्त थकवा येणे, हिरड्यांतून रक्त येणे, जखम होणे, केस (Hair) गळणे यासारख्या समस्या या आजारात दिसून येतात. व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेली मोसंबी हा आजार बरा करण्यास मदत करते. जर तुम्हाला स्कर्वी असेल तर दररोज किमान २ ग्लास तरी मोसंबीचा रस प्यायला हवा.

४. कावीळमध्ये मोसंबीचा रस पिणे आरोग्यदायी -

कावीळ रक्तातील बिलीरुबिनच्या वाढीमुळे होते आणि हिपॅटायटीस, पित्ताशयातील खडे, ट्यूमरमुळे देखील होऊ शकते. कावीळ झालेल्या रुग्णांनी समतोल आहार घेणे आवश्यक आहे. कारण तेलकट, स्निग्ध पदार्थाच्या सेवनामुळे स्थिती आणखी बिघडू शकते. कावळी झाल्यास मोसंबीचे सेवन करावे त्यामुळे अन्न सहज पचते आणि यकृताचे कार्य सुधारते.

५. रोग प्रतिकारशक्ती मजबूत करा -

व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेला मोसंबीचा रस रोग प्रतिकारशक्ती वाढवून अनेक रोग आणि संक्रमणांपासून संरक्षण करतो. खोकला, सर्दी आणि ताप यासारख्या अनेक प्रकारच्या मौसमी संसर्गापासून संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका हे फळ करते. व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गावर मात करण्यासाठी आठवड्यातून किमान तीन वेळा या फळाचे सेवन करा.

६. डिहाइड्रेशनपासून संरक्षण -

डिहायड्रेशनमुळे अचानक ताप, थंडी यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि शरीरातील चेतना नष्ट होणे यांसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि इतर खनिजांनी समृद्ध असलेल्या मोसंबीचा एक ग्लास रस प्यायल्याने शरीरातील हरवलेले इलेक्ट्रोलाइट्सचे बिघडलेले संतुलन पुन्हा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

७. हाडांची मजबूती -

वाढत्या वयाबरोबर हाडांच्या समस्या अनेकदा जाणवू लागतात. अनेकांना ऑस्टियोआर्थराइटिस, संधिवात यांसारखे आजार होतात. हे सर्व रोगप्रतिकारक पेशींच्या ऊतींमुळे होत असते. व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिडने समृद्ध असतलेला मोसंबीचा रस हाडे मजबूत करतो आणि सांध्याचे कार्य सुधारतो.

डिस्क्लेमर: मोसंबीचा आहारात समावेश करताना कृपया आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.