Coriander Water Benefits : रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या धण्याचे पाणी, होतील अनेक फायदे !

Home Remedies : मसाल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या धण्यामध्ये औषधी गुणधर्म असतात.
Coriander Water Benefits
Coriander Water BenefitsSaam Tv

Coriander Water Benefits : भारतीय स्वयंपाक घरात जेवणाची चव वाढवण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर केला जातो. त्या मसाल्यातील धणे अन्नपदार्थाची चव दुप्पट करते. मसाल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या धण्यामध्ये औषधी गुणधर्म असतात.

पोटॅशियम ,कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी हे आरोगायाठी आवश्यक पोषणघटक धण्यामध्ये आढळतात. त्यामुळे तुम्हाला धण्याचा वापर करून अनेक आजार टाळता येतात. धण्याचा वापर करण्याचा सोपा पर्याय म्हणजे रोज सकाळी रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पिणे.

Coriander Water Benefits
Honey Benefits : फक्त खाण्यासाठीच नाही तर 'या' गोष्टींसाठी देखील केला जातो मधाचा वापर !

धण्याच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि फोलिक ऍसिड असते. त्यामुळे नियमितपणे याचे सेवन करून तुम्ही रक्ताची कमतरता दूर करू शकाल. तसेच तुम्हाला इतर आरोग्यासंबंधित फायदे देखील होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊ याविषयी माहिती.

1. पचनशक्ती सुधारण्यास फायदेशीर (Benefits)

पचनशक्ती संबधित समस्या दूर करण्यासाठी धन्याचे पाणी काम करते. त्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पियायचे आहे. ज्याने पोटदुखी, पोटात आग पडणे, गॅस या सारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. पचनसंस्थेला नियंत्रित ठेवण्यासाठी धण्याचे पाणी पिणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Coriander Water Benefits
Diabetes Health Care : मधुमेही रुग्णांच्या शरीराच्या 'या' भागावर होतो परिणाम, जाणून घ्या उपाय

2. वजन कमी करण्यासाठी

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर धण्याचे पाणी हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. रोज नियमितपणे तुमच्या डायटमध्ये धन्याच्या पाण्याच्या समावेश करून तुम्ही वजन कमी करू शकता. धण्याचे पाण्यात असलेले गुणधर्म मेटाबॉलिज्मच्या प्रकियेला गती देण्यास मदत करते.

3. थायरॉईडसाठी फायदेशीर

ज्या लोकांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी रोज सकाळी रिकाम्या पोटी धन्याचे पाणी प्यायल्याने थायरॉईडचा त्रास कमी होतो. दोन्ही प्रकारच्या थायरॉईडसाठी धन्याचे पाणी (Water) फायदेशीर समजले जाते.

4. रोगप्रतिकरशक्ती वाढण्यासाठी

कमकुवत रोगप्रतिकरशक्ती वाढवण्यासाठी कोथिंबीरच्या बियाचे पाणी पिणे गरजेचे आहे. कोथिंबीरच्या बियात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी मदत करतात. परिणामी अनेक आजारांशी (Disease) लढण्यास सहकार्य मिळते.

Coriander Water Benefits
Women Health Tips : वयाच्या 60व्या वर्षीही महिला राहतील तंदुरुस्त, जाणून घ्या 4 हेल्दी टिप्स !

5. केस मजबूत करण्यासाठी

व्हिटॅमिन (Vitamins) सी, के, आणि ए या जीवनसत्वांचे प्रमाण कोथिंबीरमध्ये असते. केसांसाठी आवश्यक असणारे गुणधर्म कोथिंबीरमध्ये आढळतात. त्यामुळे केस (Hair) मजबूत करण्यासाठी तुम्ही धण्याचे पाणी पिऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com