
Best way to clean your clay pots : उन्हाळा आला की आपल्याला सतत तहान लागते. या उकाड्याच्या दिवसात साध्या पाण्याने काही आपली तहान जात नाही. अशावेळी सर्वांनाच भूरळ पडते ती थंडगार पाण्याची.
पण बऱ्याचदा फ्रीजचं थंड पाणी बाधणारं ठरतं आणि उन्हाळा असून ही आपल्याला थंड पाण्याचा आस्वाद घेता येत नाही. तेव्हा बरेच लोकं थंड पाण्यासाठी पारंपारिक माठातल्या पाण्याला निवडतात.
माती पासून बनवलेले हे माठ पाणी (Water) साठवण्यासाठी अगदी पूर्वंपारापासून चालत आलेले साधन आहे. माठात एकदा पाणी भरले की ते 2 ते 3 तासात ते थंड होते. तसेच माठातील पाणी पिण्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील अनेक फायदे (Benefits) आहेत. म्हणूनच लोकं उन्हाळ्यात माठातील पाण्याला महत्त्व देतात. परंतु माठातील पाणी पिताना या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. माठात पाणी जास्त काळ साठवल्यास अनेकदा त्यात अळ्या तयार होतात अशा वेळी माठाची स्वच्छता (Clean) कशी करायची? जाणून घेऊयात.
1. तुम्हाला जर माठातील पाणी अधिक काळ थंड राहावे असे वाटत असेल तर माठाला खेळत्या हवेच्या ठिकाणी ठेवा. यामुळे पाणी थंड रहाते.
2. माठाला कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. माठाला नेहमी स्टँडवर ठेवा. यामुळे माठ स्थिर रहाते आणि पाणी थंड राहाण्यास मदत होते.
3. माठातील पाण्याला नेहमी झाकून ठेवावे जेणेकरुन पाण्यावर धुळ बसणार नाही.
4. माठातील पाणी जास्त काळ थंड ठेवण्यासाठी माठाच्या तोंडाला कॉटनचा कपडा बांधल्यानेही पाणी थंड राहाण्यास मदत होते.
5. माठातील पाणी दररोज बदलावे. शक्य नसल्यास किमान आठवड्यातून एकदा बदलणे आवश्यक आहे. त्याचबरोबर माठाला नियमित स्वच्छ करणेही माठातील पाणी बदलण्या एवढेच महत्त्वाचे आहे. माठ धुण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या केमिकलयुक्त पाण्याचा वापर करु नये.
1. कसे कराल माठ स्वच्छ?
सर्वप्रथम माठातील पाणी एका स्वच्छ स्टीलच्या भांड्यात काढून घ्या. ज्यामुळे त्यात नक्की अळ्या तयार झाल्या आहेत की नाही हे कळेल.
यानंतर माठात 2 ते 3 ग्लास पाणी घालून माठ गोल-गोल फिरवून पाणी घुसळून माठ रिकामा करुन घ्या.
काही काळाने परत पाणी घालून कॉटनच्या कापडाने आतली बाजू पुसून घ्या आणि पाणी बाहेर काढून टाका.
दोन-तीन वेळा माठ धुतल्यास तुमचा माठ स्वच्छ होईल. माठाला दोन्ही बाजूने धुवायला विसरू नका.
2. काय आहेत माठातल्या पाण्याचे फायदे
उन्हाळ्याच्या दिवसांत माठातील पाणी थकवा दूर करण्यास मदत करते.
माठातल्या पाण्याने डोकेदुखी, पोटदुखी, अपचन सांसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
मातीतील शुध्दीकरण करणारे पदार्थ पाण्यातील विषारी पदार्थ शोषून घेतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.