Drone Delivery: ऑनलाईन जेवण मागवलं तर ड्रोन आणून देणार! 'या' शहरांमध्ये मिळणार सेवा

स्विगी (Swiggy) किंवा झोमॅटोवरून (Zomato) ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर (Online Food Order) जेवण मागवलं आणि काही वेळाने तुमच्या खिडकीवर ड्रोन (Drone) ठोठावल्यास आश्चर्यचकित होऊन जाऊ नका.
Drone Delivery
Drone DeliverySaam Tv

तुम्ही स्विगी (Swiggy) किंवा झोमॅटोवरून (Zomato) ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर (Online Food Order) जेवण मागवलं आणि काही वेळाने तुमच्या खिडकीवर ड्रोन (Drone) ठोठावल्यास आश्चर्यचकित होऊन जाऊ नका. कारण हे लवकरच खरे ठरणार आहे. इतकंच नाही तर तुम्ही डिपार्टमेंटल स्टोअरमधून कोणतीही वस्तू ऑर्डर केली तर ती तुमच्या घरी पोहोचवण्यासाठीही ड्रोन येऊ शकतो. काही कंपन्यांनी ड्रोन डिलिव्हरीसाठी पूर्ण तयारी केली आहे. (Drone Delivery In India)

ही कंपनी या शहरांमध्ये 200 ड्रोन लॉन्च करत आहे

लास्ट माईल डिलिव्हरी कंपनी Zypp इलेक्ट्रिकने गेल्या आठवड्यात सांगितले की ते ड्रोन लॉजिस्टिक क्षेत्रात प्रवेश करण्यास तयार आहे. आतापर्यंत, इलेक्ट्रिक वाहनाद्वारे खाद्य पदार्थ वितरण करणार्‍या कंपनीने ड्रोनद्वारे वस्तू वितरीत करण्यासाठी TSAW Dronesशी हातमिळवणी केली आहे. ही कंपनी पहिल्या टप्प्यात 200 ड्रोन बाजारात आणणार आहे. हे ड्रोन सध्या दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि पुणे येथे फूड डिलिव्हरी (Food Delivery) करतील. (Drone delivery company)

Drone Delivery
खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा; नवी मुंबईत 4 दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोना

डिलिव्हरीमध्ये या ड्रोनचा वापर केला जाणार आहे

TSAW Drones डिलिव्हरी करणारे ड्रोन विकसित करत आहे. कंपनीने यापूर्वीच अनेक ड्रोन तयार केले आहेत, जे खास डिलिव्हरी करण्यासाठी विकसित केले गेले आहेत. डिलिव्हरी ड्रोनच्या 2 मॉडेल्सची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. पहिले मॉडेल मारुती 2.0 आहे, जे कमी अंतराच्या वितरणासाठी (40 किमी पर्यंत) विकसित केले आहे. दुसरीकडे, दुसऱ्या ड्रोन Adarna ची डिलिव्हरी रेंज 110 किमी पर्यंत आहे. हे दोन्ही मॉडेल 5 किलोपर्यंत भार उचलू शकतात.

डिलिव्हरी ड्रोनमध्ये स्मार्ट लॉकर बसवण्यात येणार आहे

Zypp इलेक्ट्रिकने सांगितले की, सध्या डिलिव्हरीसाठी लॉन्च करण्यात आलेल्या सर्व ड्रोनमध्ये स्मार्ट लॉकर्स असतील. डिलिव्हरी मागणाऱ्या ग्राहकाला एक OTP पाठवला जाईल, जो स्मार्ट लॉकर उघडण्यासाठी टाकला जाणार. यामुळे डिलिव्हरी केल्या जाणाऱ्या पदार्थाची सुरक्षित असेल. तसेच ड्रोनने डिलिव्हरी सुरू झाल्यावर लोकांचा वेळही वाचेल, असे सांगण्यात आले आहे.

हे देखील पहा-

नवीन तंत्रज्ञानाचा वापर

हे ड्रोन केवळ एका ठराविक ठिकाणीच नाही तर शहरांमधील अपार्टमेंटमध्येही पदार्थ पोहोचवतील. ते स्वतःहून लोकेशन ट्रॅक (Location Track) करण्यासाठी तंत्रज्ञानाने सुसज्ज बनवण्यात आले आहे. याशिवाय, डिलिव्हरी ड्रोनमध्ये रिमोट-आयडी (Remote-ID) आणि डिटेक्ट अँड अव्हॉइड (DAA) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे ड्रोनला कोणत्याही उडणाऱ्या वस्तू किंवा कोणत्याही इमारतीशी टक्कर होण्यापासून संरक्षण करणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com