इको फ्रेंडली सेक्स काय आहे? हवामान बदलाच्या काळात का आहे गरजेचा?

आजकाल हवामान बदल ही एक मोठी समस्या आहे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शून्य कार्बन असणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
इको फ्रेंडली सेक्स काय आहे? हवामान बदलाच्या काळात का आहे गरजेचा?
इको फ्रेंडली सेक्स काय आहे? हवामान बदलाच्या काळात का आहे गरजेचा?Saam TV

आजकाल हवामान बदल ही एक मोठी समस्या आहे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शून्य कार्बन असणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या जीवनशैलीत काही बदल करून आपण खूप योगदान देऊ शकतो आणि यामध्ये आपल्या लैंगिक जीवनाचा समावेश होतो. सेक्समध्ये असे बरेच काही घडते, ज्यामुळे कार्बन फूटप्रिंट वाढते. ते कमी करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे उपाय आणि वस्तू उपलब्ध आहेत, पण त्याबद्दल कधीच उघडपणे बोलले जात नाही. इंटरनेटवर शोधले तर विगन कंडोम, प्लास्टिक मुक्त गर्भनिरोधक आणि बायोडिग्रेडेबल सेक्स टॅाय इत्यादी आहेत आणि त्यांची संख्या सतत वाढत आहे. म्हणजेच काही लोक त्यांचा वापर करत आहेत, तसेच पुरवठ्याची व्याप्ती सतत वाढत आहे.

इको-फ्रेंडली सेक्सचा अर्थ असा आहे की लोकांनी सहसा असे लुब्रिकेंट्स, टॉईस, कंडोम आणि बेडशीट वापरावेत ज्याचा पर्यावरणावर कमीत कमी परिणाम होतो. त्याच वेळी, काही तज्ञ म्हणतात की पोर्नोग्राफीच्या निर्मितीमध्ये कामगार आणि पर्यावरणाचे होणारे नुकसान कमीतकमी असावे.

इको फ्रेंडली सेक्स काय आहे? हवामान बदलाच्या काळात का आहे गरजेचा?
"सरकुला खेळ!" डोंगर भागात खेळला जाणारा आदिवासी मुलांचा अनोखा खेळ...

प्लास्टिक की कंडोम

पर्यावरणाच्या नाशात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वाटा आहे, अशी चर्चा खूप होते, पण कंडोमची चर्चा होत नाही. हा मोठा मुद्दा असला तरी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडाचा अंदाज आहे की दरवर्षी 10 अब्ज कंडोम बनवले जातात आणि यापैकी बहुतेक कंडोम वापरानंतरच्या कचऱ्यात जमा होतात. याचे कारण असे की कंडोमचा पुनर्वापर करता येत नाही कारण ते सिंथेटिक लेटेक्सपासून बनवले जातात आणि त्यात वेगवेगळी रसायने वापरली जातात. प्लास्टिकप्रमाणेच ते पर्यावरणाला हानी पोहोचवण्याचे काम करतात. आता काही कंपन्यांनी बायोडिग्रेडेबल कंडोम बनवायला सुरुवात केली आहे. ज्यामुळे कचऱ्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.

लुब्रिकंट

बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक लुब्रिकंट हे पेट्रोलियमवर आधारित असतात, त्यामुळे त्यात जीवाश्म इंधने असतात. या समस्येवर एकच उपाय तो म्हणजे पाण्यावर आधारित लुब्रिकंट किंवा इतर सेंद्रिय उत्पादने. अनेक देशांमध्ये घरगुती लुब्रिकंट देखील वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. असे एक लुब्रिकंट आहे जे कॉर्न स्टार्च आणि पाण्याच्या मिश्रणाने घरी बनवता येते.

सेक्स टॉईज

लैंगिक जीवनाला पुढील स्तरावर नेण्यासाठी सेक्स टॉयचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परदेशात हा एक अब्ज डॉलरचा उद्योग आहे. भारतातही गेल्या काही वर्षांत सेक्स टॉईजची मागणी वाढली आहे. टॉईजची समस्या अशी आहे की त्यामध्ये प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, त्यामुळे शेवटी ते पर्यावरणाला हानी पोहोचवतात. स्टील आणि काचेचे टॉईज आता उपलब्ध असले तरी त्यांना मर्यादा आहेत. तुम्हाला इको फ्रेंडली टॉईज हवे असतील तर रिचार्ज करण्यायोग्य टॉईज किंवा सौरऊर्जेवर चालणाऱ्या टॉईज उपयोगी ठरतील.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com