Car Overloading : वीकेंडला बाहेर जाताना कारमध्ये जास्त सामान ठेवताय? होईल हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या

Disadvantage Of Overloading Car : तुम्ही बाहेर जाता तेव्हा कारमध्ये तुम्हाला वाटेल तितके सामान ठेवतात.
Car Overloading
Car Overloading Saam Tv

Effects Overloading A Vehicle :

तुम्ही बाहेर जाता तेव्हा कारमध्ये तुम्हाला वाटेल तितके सामान ठेवतात. तसेच कारमध्ये जितके लोक बसू शकतात त्यापेक्षा जास्त लोक बसल्याने ओव्हरलोडची समस्या होऊ शकते. जे अगदीच चुकीचे आहे. यामुळे तुमच्या कारमध्ये अनेक समस्या होतात.

जर तुम्ही तुमची गाडी ओव्हरलोड (Overload) करत असाल तर तुमच्या वाहनांच्या कोणत्या भागांवर त्याचा परिणाम होतो ते पाहूयात.

Car Overloading
New Car Buying Tips : नवीन कार खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या, वाचू शकतात हजारो रुपये

इंजिनवर परिणाम होतो

इंजिन हे कारमध्ये सर्वात जास्त महत्वाची भूमिका बजावते. जर तुम्ही जास्त सामान ठेवले किंवा तुमची गाडी (Vehicle) ओव्हरलोड केली तर त्याचा इंजिनवर खूप वाईट परिणाम होतो. असे केल्याने इंजिनचे काही भाग लवकर खराब होतात ज्यामुळे तुम्हाला रस्त्याच्या मध्येच समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सस्पेंशनवर परिणाम

जर तुम्ही दररोज कार चालवत असाल तर कारमध्ये सस्पेंशन किती महत्त्वाची भूमिका बजावते याची तुम्हाला जाणीव होईल. ओव्हरलोडिंगमुळे गाडीच्या सस्पेन्शनवरही परिणाम होतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर, कारचे सस्पेन्शन एका विशिष्ट वजनानुसार बनवले जाते आणि जेव्हा तुम्ही कार खरेदी करायला जाता तेव्हा तुम्हाला तिची बसण्याची क्षमताही सांगितली जाते. जास्त सामान किंवा ओव्हरलोडिंग असल्यास, सस्पेंशनवर नकारात्मक परिणाम होईल.

टायरच्या अलाइनमेंट खराब होईल

जेव्हा तुम्ही कारमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान ठेवता तेव्हा टायरच्या अलाइनमेंटवर सर्वात जास्त परिणाम (Effects) होतो. टायरची अलाइनमेंट लवकर खराब होते. त्यामुळे गाडीत कधीही जास्त सामान ठेवू नये. टायर खराब झाल्याने दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला हजारोंचा खर्च येऊ शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com