Skin Care: त्वचेसाठी असे फायदेशीर ठरेल अंड

अंड्याचा असा होईल चेहऱ्यासाठी उपयोग
Skin Care: त्वचेसाठी असे फायदेशीर ठरेल अंड
Skin care tips in Marathi, benefits of eggs for skinब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बहुतेक लोक नाश्त्यात अंडी खातात. अंडी खाण्याचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. परंतु अंड्याचा वापर त्वचेच्या काळजीसाठी देखील आपण करू शकतो. अंडी शरीरासाठी आरोग्यदायी तर आहेच, पण ते केस आणि त्वचाही निरोगी ठेवण्यास मदत करते. रोज उकडलेले अंडे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. पिवळ्या भागासह अंडी खाल्ल्याने शरीराला प्रोटीनसोबत बायोटिनही मिळते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि त्वचेवरील (Skin) सुरकुत्या कमी होतात आणि चेहराही चमकदार होतो. (Skin care tips in Marathi)

हे देखील पहा -

तसेच चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, सुरकुत्या, वृद्धत्वाची चिन्हे आणि पिगमेंटेशन दूर करण्यासाठी देखील अंडी खूप महत्त्वाची आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी अंड्यांचा वापर कोणत्या प्रकारे केला जाऊ शकतो ते जाणून घेऊया.

१. पिगमेंटेशनसाठी -

चेहऱ्याचा किंवा शरीराचा कोणताही भाग तुमच्या सामान्य त्वचेच्या रंगापेक्षा गडद होतो आणि त्यावर बारीक ठिपके तयार होत असतात, तेव्हा त्याला पिगमेंटेशन म्हणतात. याचे कारण त्वचेच्या विशिष्ट भागात मृत पेशी निर्माण होतात. चेहऱ्यावर मध आणि लिंबू मिसळून अंडी लावल्यास त्वचेवरील डाग, पिगमेंटेशन किंवा सन टॅनिंगवर चांगला परिणाम होतो.

Skin care tips in Marathi, benefits of eggs for skin
Skin Care : भेगा पडलेल्या टाचांपासून अशी मिळवा सुटका!

२. ब्लॅकहेड्साठी -

नाकाजवळ चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स अलगद दिसू लागतात, आपण कितीही सुंदर असलो तरीही हे ब्लॅकहेड्स आपले सौंदर्य कमी करतात. अंड्याचा पांढरा रंग या ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी खूप मदत करतो. टिश्यू पेपरच्या तुकड्यात अंड्याचा पांढरा भाग घेऊन ब्रशने चेहऱ्याच्या ब्लॅकहेड्सवर लावा आणि त्यावर टिश्यूचे तुकडे ठेवा. त्यानंतर पुन्हा एकदा अंडी टिश्यूवरच लावा. टिश्यू कोरडे होईपर्यंत किंवा सुमारे १० मिनिटांनंतर टिश्यू पेपरचे तुकडे चेहऱ्यावरून काढून टाका. त्यामुळे मुळापासून ब्लॅकहेड्स बाहेर येतील.

३. चमकदार त्वचेसाठी अंडी -

जर त्वचा संवेदनशील असेल, तर तुम्ही ग्लोसाठी एग मास्क (Mask) लावू शकता. हे करण्यासाठी अंड्यामध्ये दही, मध आणि काकडीचा रस मिसळा. त्यानंतर ते १० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

काळजी (Care) घ्या

अंड्याचा फेस मास्क चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवू नका. अंड्याचा फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. ते लावण्यासाठी तुम्ही मेकअप ब्रश वापरू शकता, ज्यामुळे आपल्याला चेहऱ्यावर लावणे सोपे जाईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.