Tata Motors: तुमच्या बजेटमधील इलेक्ट्रिक कार आली; फक्त २१ हजारांत बुक करा!

टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज त्‍यांच्‍या ईव्‍ही समूहामधील नवीन वेईकल टियागो.ईव्‍हीच्‍या बुकिंगच्‍या शुभारंभाची घोषणा केली.
Tata Motors
Tata MotorsSaam Tv

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने (Company) आज त्‍यांच्‍या ईव्‍ही समूहामधील नवीन वेईकल टियागो.ईव्‍हीच्‍या बुकिंगच्‍या शुभारंभाची घोषणा केली. ही कार पहिल्‍या १०,००० ग्राहकांसाठी ८.४९ लाख रूपये (संपूर्ण भारतात - एक्‍स-शोरूम) या स्‍पेशल सुरूवातीच्‍या किंमतीमध्‍ये लाँच करण्‍यात आली आहे, ज्‍यापैकी २००० मॉडेल्‍स नेक्‍सॉन ईव्‍ही व टिगोर ईव्‍हीच्‍या विद्यमान मालकांसाठी आरक्षित असतील.

बुकिंगबाबत माहिती:

टियागो.ईव्‍हीसाठी बुकिंग्‍जना १० ऑक्‍टोबरपासून सुरूवात होईल. ही कार (Car) कोणत्‍याही अधिकृत टाटा मोटर्स डिलरशिपमध्‍ये किंवा www.Tiago.ev.tatamotors.com या वेबसाइटवर २१,००० रूपये बुकिंग रक्‍कम भरत बुक करता येऊ शकते. टियागो.

Tata Motors Interior
Tata Motors InteriorCanva

ईव्‍ही ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये प्रमुख शहरांमधील आघाडीच्‍या मॉल्‍समध्‍ये प्रदर्शनार्थ ठेवण्‍यात येईल.

ग्राहकांसाठी टेस्‍ट ड्राइव्‍ह्स डिसेंबर २०२२ च्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यापासून उपलब्‍ध असतील. टियागो.ईव्‍हीच्‍या डिलिव्‍हरींना जानेवारी २०२३ पासून सुरूवात होईल.

वेळ, तारीख, तसेच निवडण्‍यात आलेला व्‍हेरिएण्‍ट व रंगानुसार वेईकलची डिलिव्‍हरी तारीख ठरवण्‍यात येईल.

डिलिव्‍हरीच्‍या वेळी ग्राहकांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍यासाठी ग्राहक अभिप्रायांनुसार २४ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक व्‍हेरिएण्‍ट्सच्‍या उत्‍पादनाला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.

ईव्‍ही अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या मनसुब्‍यासह काही नवनवीन शहरांमध्‍ये आमचे नेटवर्क स्ट्रॉंग करीत आहेत.

Tata Motors
Tata Motors : भारतातील सर्वात सुरक्षित कार माहितेय का? टाटा मोटर्सने लाँच केली 'ही' एडिशन

टियागो.ईव्‍हीमध्ये फिचर्सची मोठी यादी आहे -

Tata Tiago इलेक्ट्रिक कार अनेक उत्तमोत्तम वैशिष्ट्यांसह भारतात आणण्यात आली आहे. यात कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षिततेसाठी, इलेक्ट्रिक हॅचबॅकला EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स, मागील पार्किंग कॅमेरा आणि सीट बेल्ट रिमाइंडर मिळतात. तसेच इलेक्ट्रिक कारमध्ये मल्टी-मोड रिजन ब्रेकिंग सिस्टीम दिसते.

Tata Motors
Tata MotorsCanva

हाय-व्‍होल्‍टेज अत्‍याधुनिक झिप्‍ट्रॉन टेक्नॉलॉजीवर आधरित टियागो.ईव्‍ही कार्यक्षमता, तंत्रज्ञान, विश्‍वसनीयता, चार्जिंग व आरामदायीपणा या ५ प्रमुख आधारस्‍तंभांवर प्रबळ आहे. ही कार मल्‍टी-मोड रिजेन व दोन ड्राइव्‍ह मोड्स – सिटी व स्‍पोर्ट सह डिजिटल ड्राइव्‍ह, अद्वितीय सानुकूल ड्रायव्हिंग अनुभव देते. टियागो.ईव्‍ही आयपी६७ प्रमाणित बॅटरी पॅक्‍स (जल व धूळ रोधक) आणि चार्जिंग पर्यायांच्‍या विविध संयोजनांमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे. या कारमध्‍ये दैनंदिन लांबच्‍या प्रवासासाठी ३१५ किमीची मोडिफाइड इंडियन ड्रायव्हिंग सायल (एमआयडीसी) रेंज देणारा २४ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक आणि लहान व वारंवार ट्रिप्‍ससाठी २५० किमीची अदांजित एमआयडीसी रेंज देणारा १९.२ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक आहे.

टाटा मोटर्स टियागो.ईव्‍हीला चार्ज करण्‍यासाठी ४ विभिन्‍न चार्जिंग सोल्‍यूशन्‍स देत आहे:

कुठेही, कधीही विनासायास चार्जिंगसाठी १५ अॅम्पियर प्‍लग पॉइण्‍ट

प्रमाणित ३.३ केडब्‍ल्‍यू एसी चार्जर

७.२ केडब्‍ल्‍यू एसी होम फास्‍ट चार्जर, जो फक्‍त ३० मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये ३५ किमी अंतरापर्यंत प्रवासाची खात्री देऊ शकतो. तसेच ३ तास ३६ मिनिटांमध्‍ये वेईकलची संपूर्ण चार्जिंग (१० टक्‍क्‍यांपासून १०० टक्‍क्‍यांपर्यंत) होऊ शकते.

डीसी फास्‍ट चार्जिंग, जे फक्‍त ३० मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये ११० किंमी अंतरापर्यंत प्रवासाची खात्री देऊ शकते आणि फक्‍त ५७ मिनिटांमध्‍ये वेईकलला १० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज करू शकते.

Tata Motors
कम्माल! आता Whatsapp Groupमध्ये 1024 मेंबर्स अ‍ॅड करता येणार; पाहा व्हॉट्सअ‍ॅपचे नवे अपडेट्स

टियागो.ईव्‍हीमध्‍ये कॅटेगरी फर्स्‍ट टेलिमॅटिक्‍स फिचर :

जे प्रमाणित म्‍हणून सर्व ट्रिम्‍समध्‍ये देण्‍यात आले आहे. तसेच या कारमध्‍ये जवळपास ४५ कनेक्‍टेड कार फिचर आणि प्रिमिअम इंटीरिअर्स आहे. या कारचा आकर्षक लुक व फील लेदरेट सीट्स, कॉन्‍ट्रास्‍ट रूफ, फुली ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल, प्रोजेक्‍टर ऑटो हेड लॅम्‍प्‍स, रेन सेन्सिंग वायपर्स व क्रूझ कंट्रोल अशा सर्वोत्तम फिचर्ससह वाढवण्‍यात आला आहे. जीएनसीएपी ४ स्‍टार रेटेड टियागोवर आधारित टियागो.ईव्‍ही रस्‍तयावरील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक हॅच असेल आणि ग्राहकांसाठी निवडण्‍याकरिता टील ब्‍ल्‍यू, डेटोना ग्रे, प्रिस्टिन व्‍हाइट, मिडनाइट प्‍लम व ट्रॉपिकल मिस्‍ट या पाच रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com