Rava Veg Tikki Recipe : हिवाळ्यात चमचमीत रव्याच्या व्हेज टिक्कीचा आस्वाद घ्या, पहा रेसिपी

रव्याचा वापर करून तुम्ही सहज कोणतीही रेसिपी बनवू शकता.
Rava Veg Tikki Recipe
Rava Veg Tikki Recipe Saam Tv

Rava Veg Tikki Recipe : थंडीत सतत काहीतरी खाण्याची इच्छा होते अश्यात रोज नाश्ट्यात एकच पदार्थ खाऊन बोर झाला असले आणि काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा असेल तर आपण नवीन नवीन प्रकर घरी (Home) बनवून बघत असतो पण रोज काय नवीन बनवायचे? हा प्रश्न सोडवण्यााठी आम्ही तुमच्या एक रेसीपी घेऊन आलो आहोत.

रवा चा वापर करून तुम्ही सहज ही रेसिपी बनवू शकता. आतापर्यंत तुम्ही रव्याचा शिरा, लाडू, उपमा, रवा इडली, डोसा हे पदार्थ (Food) खालले असतील पण तुम्ही कधी रवा व्हेज टिक्की खाली आहे का ?चला तर बघुया रवा व्हेज टिक्की कशी बनवतात.

Rava Veg Tikki Recipe
Multigrain Chapati Recipe : थंडीच्या दिवसात हेल्दी व फिट राहायचे आहे ? आहारात समावेश करा मल्टीग्रेन चपातीचा, पाहा रेसिपी

रवा व्हेज टिक्कीसाठी साहित्य -

1/2 कप रवा, 1/3 कप बेसन, 1 छोटी शिमला मिरची, तुमच्या चावी नुसार-हळद, मिठ, काळी, मिरी, लाल तिखट, हिंग, 1कांदा, 1 गाजर, अर्धा कप दही, 2 कप पाणी आणि तेल

Rava Veg Tikki Recipe
Rabadi Recipe : गोड खाण्याचे शौकिन आहात? घरच्या घरी बनवा रबडी, पाहा रेसिपी

कृती -

  • गरम पाण्यात रवा उकळून घ्या आणि त्याला चांगले शिजवून घ्या.

  • त्यात स्वाद नुसार मिठ,लाल तिखट, जीर टाकून छान परतून घ्या.

  • मिश्रण थोडा वेळ शिजल्यावर त्यात चिरलेला कांदा,टोमॅटो टाकून मिक्स करा.

  • आता यात शिमला मिरची,हिरवी मिरची आणि पाव भाजी मासला टाकून एकजीव करून घ्या.

  • एकजीव झालेले मिश्रण एका परातीत टाकून पसरून घ्या आणि थोडे गार होऊ द्या.

  • या सेट झालेल्या मिश्रण चे लहान पिस मध्ये कट करा.

  • नंतर एका कढईत तेल गरम करून हे पिस दोन्ही बाजू लाल होई पर्यंत फ्राय करून घ्या.

  • तयार रवा व्हेज टिक्की तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com