Nilgiri Oil Benefits : अनेक वेदनांपासून निलगिरीचे तेल देईल आराम !

निलगिरीच्या तेलाचा फायदा असा होईल.
nilgiri oil benefits in marathi, health benefits of nilgiri oil
nilgiri oil benefits in marathi, health benefits of nilgiri oilब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सर्दी, फ्लू, घसा खवखवणे, दम्याचा त्रास आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या समस्यांमध्ये निलगिरीचे तेल आराम देते. आजकाल हे आजार वाढत जाणारी समस्या बनली आहे.(Nilgiri oil benefits in Marathi)

हे देखील पहा -

बदलती जीवनशैली, शारिरीक श्रम न करणे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला मानेचा किंवा पाठीचा त्रास जाणवू लागतो. ही वेदनादायक समस्या असून यावर वेळीच उपचार करणे अधिक गरजेचे आहे. यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. आरोग्याची काळजी न घेतल्यास वाढत्या वयाबरोबर याचा त्रास होऊ लागतो. आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असे निलगिरी तेल फायदेशीर ठरते. अनेक आजांरामध्ये फायदेशीर अशा निलगीरी तेलाविषयी जाणून घेऊया.

१. निलगिरी तेलांत सेनौलेसारखे अँटीइन्फ्लेमेटरीचे गुणधर्म असल्यामुळे हे तेल दुखण्यावर रामबाण उपाय करते. सर्दी-पडशामुळे छातीच्या बरगड्यांमध्ये वा छातीत वेदना होत असतील तर यांने मालीश केल्यास फायदा होतो.

nilgiri oil benefits in marathi, health benefits of nilgiri oil
Monsoon Tips: अतिवृष्टी किंवा पूर परिस्थिती आल्यास काय कराल ?

२. शरीराच्या अवयवांमध्ये वेदना व कडकपणा असल्यास उपयुक्त ठरते. पाठदुखी, सांधेदुखी व सुजेमध्ये निलगिरी तेलात तीळ, खोबरेल तेल, ऑलिव्ह व बदामाचे तेल मिसळून मसाज करा. निलगिरी तेलामुळे सांधे दुखत नाही. शरीरातील नसा मोकळ्या होण्यास मदत होते.

३. निलगिरीच्या तेलाची पाण्यात टाकून वाफ घेतल्यास मेंदूचे रक्ताभिसरण वेगाने होते तसेच स्नायूंमध्ये संकुचन कमी होत असते.

४. निलगिरीत अँटीसेप्टिक गुणही आढळतो. याच्या तेल (Oil) किंवा पानांपासून तयार केलेली पेस्ट जखमांवर लावल्यास आराम मिळतो. तसेच इन्फेक्शन रोखण्यास मदत होते.

५. निलगिरी त्वचेसंबंधित समस्यांना दूर करते. याच्या पानांमध्ये थोडेसे पाणी (Water) मिसळून वाटून घ्या व चेहऱ्याला लावल्यास आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com