हजारो किमींचा प्रवास करुन युरेशियन गिधाड उजनीत दाखल; पक्षीप्रेमींच कुतुहल वाढलं!

निसर्गातील सफाई कर्मचारी अशी ओळख असल्याने युरोपमधील हा सफाई कामगार उजनीची सफाई करण्यास दाखल झाल्याची भावना पक्षी तज्ञांमध्ये उमटली आहे.
हजारो किमींचा प्रवास करुन युरेशियन गिधाड उजनीत दाखल; पक्षीप्रेमींच कुतुहल वाढलं!
हजारो किमींचा प्रवास करुन युरेशियन गिधाड उजनीत दाखल; पक्षीप्रेमींच कुतुहल वाढलं!मंगेश कचरे

बारामती: हजारो किलोमीटरचा प्रवास करून युरोपमधील युरोशियन गिधाड उजनी परिसरात दाखल झाले आहे. निसर्गातील सफाई कर्मचारी अशी ओळख असल्याने युरोपमधील हा सफाई कामगार उजनीची सफाई करण्यास दाखल झाल्याची भावना पक्षी तज्ञांमध्ये उमटली आहे. या गिधाडांच्या आगमनामुळे पक्षीनिरीक्षक आणि पक्षीप्रेमींमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे (Eurasian vultures reach to Ujani dam by travelling thousands of miles; Bird lovers' curiosity increased!)

हे देखील पहा -

सामान्य समजल्या जाणाऱ्या या गिधाडाने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव भागात पक्षी निरीक्षक उमेश सल्ले यांना दर्शन दिलंय. हिवाळ्यात उजनीच्या परिसरात विविध जातीच्या पक्ष्यांचे आगमन होत असते. यामध्ये बरेच दुर्मिळ किंवा वैशिष्ट्यपूर्ण जातीच्या नवनवीन पक्षांचा समावेश असतो. यामध्ये आता या युरेशियन गिधाडाची भर पडलीय. हा स्थलांतरित पक्षी असून हिवाळ्यात तो युरोपकडुन इकडे स्थलांतरित होतो. उजनी परिसरात तो काही काळ विसावेल असा अंदाज पक्षीतंज्ञांनी वर्तवला आहे.

हजारो किमींचा प्रवास करुन युरेशियन गिधाड उजनीत दाखल; पक्षीप्रेमींच कुतुहल वाढलं!
इंदौर ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर; राज्यातील 'या' शहराला मिळाला पुरस्कार

हजारो किलोमीटरचा प्रवास करणारा हा पक्षी आकाशात उंच घिरटय़ा घालत आपले अन्न शोधत असतो. या पक्ष्याचे इंग्रजी नाव ग्रिफॉन वल्चर असून शास्त्रीय नाव गीप्स फुल्वस असे आहे. हा एक अत्यंत मोठा पक्षी असून त्याची उंच साधारणपणे 125 से.मी. असते. तर दोन पंखांची लांबी साधारण 8 ते 9 फुटापर्यंत भरते. नर व मादी ग्रिफॉन गिधाडाचे वजन 8 ते 10किलो पर्यंत असते.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com