सावधान! मोबाइलचं अतिवापर उडवतोय तुमची झोप; 'या' गंभीर आजाराचा धोका

शांत आणि समाधानकारक झोपेसाठी सकारात्मक जीवनशैली अत्यंत आवश्यक आहे.
Mobile News
Mobile Newssaam tv

Mobile Addiction : मोबाइलच्या (Mobile) वेडापायी रात्र जागवली आणि आता झोप येण्यासाठी गोळी घ्यावी लागली, अशी स्थिती झालीय. मोबाइलचा अतिवापर अनेक आजारांना आमंत्रण देत असल्यानं कामावेळी आणि मनोरंजन म्हणून मोबाइलची लागलेली सवय आता अंगलट येतेय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाइलशिवाय काही होतंच नाही, अशी सध्या सगळ्यांची स्थिती झालीय. कामासाठी आणि मनोरंजनासाठी मोबाइलचा वापर केला जातोय.

Mobile News
Crime News : उत्तर प्रदेशातही आफताबसारखा क्रूरकर्मा; प्रेयसीचे तुकडे करून विहिरीत फेकले

परंतु आता अनेकांना मोबाइलचे वेड लागले आहे. एक व्हिडीओ पाहून झाला की दुसरा व्हिडीओ पाहिला जातो. सामाजिक माध्यमांवर रात्री उशिरापर्यंत पोस्ट टाकण्यावर भर दिला जातो. त्यातून झोप उडून जाते. याचा दुष्परिणाम असा झाला की, आता झोप येण्यासाठी गोळ्या खाव्या लागत आहेत.

मोबाइलचा रात्री उशिरापर्यंत वापर करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. त्यातून अनेक परिणामाला सामोरे जाण्याची वेळ ओढवते आहे. झोप न येणे, हा त्यातीलच एक परिणाम आहे. मोबाईलवर रात्री उशिरापर्यंत चित्रपट, वेब सिरीज पाहणे, सामाजिक माध्यमांवर सक्रिय राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून अगदी पहाट होण्याच्या वेळी झोपणेही वाढत आहे. या सगळ्यानंतर अनेकजण रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करतात. परंतु झोप येत नसल्याचाच अनुभव त्यांना येतो.

आता प्रत्येकांनी मोबाइलचा अतिवापर टाळला पाहिजे. रात्री झोपताना मोबाइल पाहिल्यास मेंदू उत्तेजित होतो. त्यासून व्यक्तीला झोप येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी मोबाइलचा अतिवापर टाळावा. शांत आणि समाधानकारक झोपेसाठी सकारात्मक जीवनशैली अत्यंत आवश्यक आहे. कमी झोप बिघडलेल्या जीवनशैलीचे, तसेच मानसिक अस्वस्थपणाचे लक्षण आहे. त्यामुळे मोबाईलच्या अतिवापरामुळे शारीरिक आजाराबरोबरच मानसिक आजाराचे जर रुग्ण व्हायचे नसेल तर आत्ताच सावध व्हा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com