Office Look : आत्मविश्वास आणखी वाढवा तुमच्या आकर्षक ड्रेसिंगने ! फॉलो करा या टिप्स

ऑफिसमध्ये छान दिसण्यासोबतच आरामदायी असणं किती महत्त्वाचं आहे हे नोकरदार महिलांना चांगलंच माहीत असते.
Office Look
Office LookSaam TV

Office Look : बहुतेक लोक स्टायलिश दिसण्यासाठी चांगले कपडे घालतात, परंतु दिवसभर त्यांना आरामदायक वाटत नाही. नेहमीच आपल्या आवडीचे कपडे परिधान करावेत, परंतु जर त्यामध्ये आरामदायक वाटत नसेल, तर ते बरोबर नाही.

ऑफिसमध्ये (Office) छान दिसण्यासोबतच आरामदायी असणं किती महत्त्वाचं आहे हे नोकरदार महिलांना चांगलंच माहीत असते. लुक आणि ड्रेसिंग सेन्स ऑफिसमध्ये आत्मविश्वास वाढवतो. म्हणूनच कपडे असे असावेत की, त्यांने स्वतःला चांगले वाटेल.

ऑफिसच्या ड्रेसिंगबाबत सगळ्यांनाच फॉर्मल कपडे आणि शूज पुरेसे वाटते. व्यावसायिक स्वरूपासाठी ते पुरेसे नाही. आपले कपडे दिसायला चांगले असतील तर आपला आत्मविश्वासही त्यावेळेस वाढेल आणि त्यामुळे ऑफिसमध्‍ये परफेक्ट लूक मिळवण्‍यासाठी खूप सोप्या टिप्स (Tips) पाहुयात ज्यामुळे ऑफिसमध्‍ये स्टायलिश आणि परफेक्ट दिसेल.

Office Look
ऑफिस वेअरसाठी ट्राय करा ट्रेंडी कुर्ती, कमी पैशांत लेटेस्ट पॅटर्न्स

१. आरामदायक कपडे निवडा -

अनेक लोक ज्यांना फॉर्मल्समध्ये आरामदायक वाटत नाही त्यांना त्यांची शैली कशी करावी हे माहित नाही. घट्ट किंवा सैल कपडे परिधान केल्याने अस्वस्थ वाटू शकते. आरामदायक वाटतील असे कपडे आणि डिझाइन निवडा. कपडे आपल्या आकाराचे असावेत. काहीवेळा ऑफिसमध्ये खास प्रसंगी कलर कोड पाळावा लागतो.

२. कॅज्युअल ड्रेस घालणे टाळावे -

ऑफिसला जाताना कॅज्युअल ड्रेस घालणे टाळावे. खरंतर, ऑफिसमधला कॅज्युअल लूक हा कॅज्युअल वागणूक दर्शवतो, तर प्रोफेशनल लूक गांभीर्य दर्शवतो. आठवड्यातून एकदा कॅज्युअल ड्रेस घालू शकता.

३. ट्रेंडचा मागोवा ठेवा -

Office Look
Sleeping After Lunch In Office : दुपारी जेवल्यानंतर ऑफिसमध्ये झोप येते ? काम करण्याची इच्छा होत नाही ? या गोष्टी करुन पहा

ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि प्रेझेंटेबल दिसण्यासाठी आकर्षक पोशाख निवडणे फार महत्वाचे आहे. यासोबतच प्रोफेशनल आउटफिट्समधील ट्रेंडचीही काळजी घ्यायला विसरू नका. जर बदलानुसार कपडे निवडले तर ते ऑफिसमध्ये परफेक्ट लूक देण्यास मदत करेल.

४. कपड्यांची योग्य साइझ आणि कम्फर्ट निवडा -

कपड्यांची योग्य साइझ आणि कम्फर्ट याकडे विशेष लक्ष द्या. वास्तविक, परफेक्ट फिटिंग आणि कम्फर्ट यांच्यात योग्य संतुलन राखणे फार महत्वाचे आहे. चांगले फिटिंग कपडे प्रेझेंटेबल बनवतात आणि खूप घट्ट कपडे अस्वस्थ करतात. त्यामुळे ऑफिससाठी नेहमी असे कपडे निवडा, जे परिधान करून आरामात बसू शकाल.

५. ऋतूनुसार कपडे घाला -

Office Look
Healthy Snacks : तुम्हाला देखील ऑफिसच्या वेळात भूक लागते ? अस्वस्थ वाटते ? या हेल्दी स्नॅक्सचे सेवन करा

ऑफिसमध्ये स्टायलिश आणि परफेक्ट लूक मिळवण्यासाठी सीझनचे कपडे घालणे खूप गरजेचे आहे. हिवाळ्यातील स्टायलिश कपडे बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय, ऋतूनुसार समर कूल लुक आणि मॉन्सून एलिगंट लुक निवडूनही परफेक्ट लुक मिळवू शकता.

६. रंग किंवा फॅब्रिक निवडा -

नेहमी असे कपडे परिधान करावे ज्यामधून आपला आत्मविश्वास लोकांच्या नजरेस पडेल. ऑफिससाठी नेहमी असे कपडे निवडा, जे परिधान करून आत्मविश्वास वाढेल. रंग किंवा फॅब्रिकमध्ये कोणत्याही प्रकारची विशेष निवड असेल तर त्याला प्राधान्य द्या, कारण काही अंशी, आत्मविश्वास कामावरही परिणाम करतो.

७. फिटिंग आणि आरामाचा समतोल राखणे आवश्यक आहे -

Office Look
How To Make Friends : नवीन जागी गेलाय ? अनोळखी व्यक्तीशी मैत्री करायची आहे ? 'या' सोप्या टीप्स फॉलो करा

कपड्यांमध्ये परफेक्ट फिटिंग आणि कम्फर्ट यांच्यात योग्य तोल राखणे फार महत्वाचे आहे. चांगले फिटिंग कपडे प्रेझेंटेबल बनवतात. कोणाला पाहिल्यानंतर कधीही ट्रेंड फॉलो करू नका, सोयीनुसार कपडे निवडा.

८. चप्पल निवडा -

कपड्यांसोबतच आपल्या चप्पलांकडेही विशेष लक्ष द्या. महिलांचे बहुतांश लक्ष कपड्यांवरच असते. चपला निवडताना ते ब्रँड आणि दर्जाकडे फारसे लक्ष देत नाहीत. म्हणूनच चांगले दिसत नाही. कपड्यांमध्ये आरामदायक असणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते चपलांसाठी आहे. बहुतेक लोक प्रथम आपल्या चपला लक्षात घेतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com