
Methi Benefits : हिवाळ्यात अनेक वेगवेळ्या हिरव्या भाज्याचा सिझन असतो आणि त्या भाज्या हिवाळ्यातच खायला पाहिजे असे म्हटले जाते. त्यातील मेथीची भाजी हिवाळ्यातच येत असते.
यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पालक, हरभरा, मेथी या भाज्या मार्केटमध्ये सहज मिळतात या सिझनल भाज्या खाल्याने तुमचे आरोग्य निरोगी राहील. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीची भाजी मदत करते. मेथीच्या बिया पण तितक्याच गुणकारी आहेत त्याचे लाडू बनवून हिवाळ्यात खाल्ल्यावर हातापायात येणारा वात कमी होतो असे म्हटले जाते. चला तर मग आता आपण मेथीच्या भाजीचे फायदे जाणून घेऊया.
1.मेथीच्या भाजीतून मिळणारे पोषकतत्व
मेथीच्या भाजीतून एकच नाही तर खूप पोषकत्त्व मिळतात. सोडियम, फायबर, व्हिटॅमिन (Vitamins), जींक, कार्बोहाइड्रेट, आयन, मॅगनीज ,पोटॅशियम, कॅल्शियम,प्रोटीन, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी इतके पोषकतत्व मेथीच्या भाजीतून मिळतात.
3. वजन कमी करण्यासाठी
मेथीची भाजी खाल्ल्याने सारखी सारखी भुख लागत नाही तुमचे पोट भरून राहते आणि शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषकतत्व मिळत असतात.जास्ती खाण्याची इच्छा होत नसल्याने तुमचे वजन कमी (Weight loss) होण्यास मदत होते.
6. प्रजनन क्षमतेसाठी
टेस्टोस्टेरॉन आणि शुक्राणूंची संख्या वाढिण्यासाठी फायेशीर आहे.२०१७ च्या एका अभ्यासानुसार ३ महिन्यासाठी ५० पुरुषांना मेथीचा अर्क देण्यात आला त्यातील ८८ टक्के पुरुषांच्या शुक्राणूं संख्येत वाढ झाली होती. मेथी मानसिक स्थिरतेसाठी मदत करते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.