Hair Care : केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असे मेथी दाणे

केस गळती थांबवायची आहे तर हे उपाय नक्की करून पहा.
Hair care tips in marathi
Hair care tips in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केस तुटणे, केस गळणे आणि अकाली केस (Hair) पांढरे होणे ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे ज्यामुळे आजकाल प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. त्यापैकी एक घरगुती उपाय म्हणजे केसांची काळजी घेण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर करणे.

हे देखील पहा -

केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदातही मेथीचा वापर करण्यात आला आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, जस्त आणि भरपूर प्रमाणात प्रथिने आढळून येतात, ज्यामुळे केसांना पोषण मिळण्यास मदत होते. यात अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. मेथीच्या दाण्याने आपण केसांची समस्या कशी दूर करू शकतो आणि त्याचा वापर करण्याचे वेगवेगळे उपाय काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

केसांमध्ये मेथी लावण्याची पद्धत आणि फायदे

१. केस गळती थांबते -

केस गळती थांबवण्यासाठी नारळाच्या तेलात मेथीचे दाणे मिसळून त्याचा वापर करा. यासाठी मेथी दाण्याची पावडर व खोबऱ्याचे तेल (Oil) एकत्र करुन आठवड्यातून दोन दिवस केसांच्या मुळांवर लावा.

Hair care tips in marathi
जाणून घ्या, पॉवर नॅपचे फायदे आणि झोप किती वेळ असावी?

२. केस मजबूत करा -

केस मजबूत करण्यासाठी मेथी दाणे पाण्यात उकळून थंड करुन घ्या. हे पाणी (Water) गाळून घ्या व त्याने केस धुवा.

३. केसांची वाढ -

केस मजबूत, चमकदार आणि लांब करण्यासाठी मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. नंतर हे दाणे बारीक करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावून अर्धा तास राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा.

अशाप्रकारे तुम्ही मेथी दाण्यांचा वापर करुन केसांची वाढ करु शकता.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com