
बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि वाढत्या आरोग्याच्या समस्येमुळे महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या अधिक प्रमाणात दिसून येतं आहे. वयाची ३० ओलांडल्यानंतर गर्भधारणा ठेवताना अनेक अडचणी निर्माण होतात.
लग्न झाल्यानंतर एक वर्षाच्या आतच अनेकांना वंध्यत्वाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जगभरातील ९० टक्के स्त्रियांना फायब्रॉइड्स, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) इत्यादी समस्यांचे निदान होत आहे ज्याचा वंधत्वाशी संबंध आहे. याबाबतची माहिती दिली आहे मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. केकिन गाला यांनी जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
1. जीवनशैली (Lifestyle)
आपली दररोजची जीवनशैली कशी आहे हे यातील एक प्रमुख कारण (Reason) आहे. हल्लीच्या स्त्रिया धुम्रपान, अल्कोहोलचे सेवन, ताणतणाव आणि वाढते वजन याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो. तसेच हार्मोनल असंतुलीत, स्त्रीबीज कमी होणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे मासिक पाळीवर देखील परिणाम होतो.
2. गर्भधारणा उशीरा का होते?
हल्लीच्या पिढीनुसार अनेक जोडपी वाढत्या वयानुसार कुटुंब (Family) नियोजन हे ३० नंतर करतात. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सारा मिशेल यांनी याबाबत मत मांडले आहे. त्या म्हणतात की, शिक्षण, करिअर, आर्थिक स्थैर्य किंवा वैयक्तिक कारणांमुळे गर्भधारणा पुढे ढकलली ज्यामुळे जोडप्यांचे वय वाढत जाते. वाढत्या वयात स्त्रीबीजाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
3. गर्भाशयाचे फायब्रॉइड्स
गर्भाशयाचे फायब्रॉइड्स ही स्त्रियांमध्ये वाढत जाणारी सर्वात सामान्य समस्या आहे. यामध्ये महिलांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. 2-3% स्त्रियांमध्ये फायब्रॉइड हे वंध्यत्वाचे एकमेव कारण असू शकते. अंदाजे 5 ते 10 टक्के महिलांमध्ये गर्भाशयाचे फायब्रॉइड विकसित होतात. ज्याचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
4. पर्यावरण
हवामानातील बदल, दूषित वातावरण, रसायने यांच्या संपर्कात येण्यासारखे पर्यावरणीय घटक प्रजनन समस्यांना कारणीभूत ठरत आहेत. आपल्या वातावरणातील विषारी द्रव्य प्रजननक्षमतेसाठी आवश्यक असलेल्या हार्मोन्सवर परिणाम करतता.
5. गर्भपातानंतरचे संक्रमण
गर्भपातानंतर उपचार न केल्यास पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज (पीआयडी) सारखे संक्रमण पसरू शकते. ज्यमामुळे प्रजनन प्रणालीवर परिणाम होतो. ज्यामुळे दीर्घकाळ वंध्यत्वाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.