Flavored butter : ब्रेडला लावल्या जाणाऱ्या बटरचे असे होतात फायदे, चव चाखाल तर खातच राहाल!

घाईच्या वेळी किंवा पटकन खाता येईल असा पदार्थ हा ब्रेड बटर
Flavored butter
Flavored butterSaam TV

Flavored butter : ब्रेड बटर हे आपल्या प्रत्येकाच्या सकाळाच्या न्याहारीचा पर्यायी पदार्थ आहे. सकाळी नाश्ता काय करायचा? घाईच्या वेळी किंवा पटकन खाता येईल असा पदार्थ हा ब्रेड बटर

गव्हाचा, मैद्याचा, मल्टीग्रेन किंवा यांसारख्या आणखी ब्रेडच्या वेगवेगळ्या पध्दतीनुसार बटर लावून त्याची चव चाखली जाते. तसेच बटरने आरोग्याच्या जगात स्वतःसाठी एक वाईट नाव कमावले असले तरी, पर्यायी व पदार्थांची चव वाढवण्यासाठी ते अधिक चांगले आहे. दुधापासून बनवलेल्या या बटरमध्ये जीवनसत्त्व ड आणि कॅल्शियम असते जे हाडांसाठी आवश्यक आहे.

Flavored butter
Benefits Of Butter Milk : पचनशक्ती बरोबरच ताकाचे आहेत अनेक फायदे, त्वचा व केसांसाठी तर बहुगुणी !

या बटरमध्ये आणखी काही पदार्थ जोडून त्याची चव वाढवता येते जाणून घेऊया त्याबद्दल

१. पॉपकॉन बटर -

Popcorn butter
Popcorn butterCanva

चिझी किंवा बटर पॉपकॉनशिवाय आपला कोणताही चित्रपट पूर्ण होत नाही. सध्या या बटर पॉपकॉनला वेगळ्याच स्तरावर नेले आहे. खारट पण मलईदार, हा स्प्रेड बनवला जातो परंतु ताजे पॉपकॉर्न केलेले सॉल्टेड पॉपकॉर्न अनसाल्टेड बटरच्या स्टिकमध्ये मिसळले जाते. तसेच याची चव चाखायची झाली तर आपण मक्याला भाजून त्यावर लिंबू,मीठ, मसाल व बटर लावून खाऊ शकतो.

२. चॉकलेट बटर -

Chocolate Bread Butter
Chocolate Bread ButterCanva

चॉकलेट (Chocolate) ब्रेड किंवा सॅण्डविच आपण नेहमी खातोच पण डेझर्ट बटर बनवायला सोपे व झटपट आहे. अनेक गोष्टींवर वापरू शकता पण साध्या टोस्टवर किंवा केकच्या वर या चवीच्या बटरचा आस्वाद घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. चॉकलेट बटरमध्ये फक्त दोन घटक असल्याने तुम्ही वापरत असलेल्या चॉकलेटच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. डार्क आणि डिकॅडेंट कोको पावडर बटरमध्ये मिसळले जाते व ब्रेडला लावून खाल्ले जाते.

Flavored butter
Travel Recipes Ideas : अचानक ठरलेल्या प्रवासात 'हे' पदार्थ बनतील झटपट, रेसिपी एकदा पहा

३. गार्लिक ब्रेड बटर -

Garlic Bread Butter
Garlic Bread ButterCanva

गार्लिक ब्रेडची चव चाखल्यानंतर अनेकांच्या जिभेवर ती चव अजूनही तशीच आहे. फ्लेवर्ड बटर घेण्यापेक्षा आपण यात भाजलेले किंवा कॉन्फिट केलेला लसूण वापरु शकतो. लसणाची (Garlic) पेस्ट व बटर वापरुन आपण ब्रेडला लावून त्याची चव चाखू शकतो. तसेच या ब्रेडच्या स्लाईसवर चीज घालून ग्रिल करा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com