Flaxseed : अळशीच्या बियांचा हृदयासोबत अनेक अवयवांना मिळेल फायदा

जाणून घेऊया अळशी किती फायदेशीर आहे.
benefits of Flaxseed in Marathi, Flaxseed Benefits
benefits of Flaxseed in Marathi, Flaxseed Benefitsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अळशी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरली जाते. अळशी खाण्याचे अनेक फायदे आहेत. अळशीमध्ये जीवनसत्त्व ई, ओमेगा फॅटी अॅसिड आढळते.(benefits of Flax seeds in Marathi)

हे देखील पहा -

अळशीचे सेवन केल्याने हृदय आणि मेंदूचे आरोग्य (Health) निरोगी राहण्यास मदत होते. अळशीच्या बियांचा वापर हा लाडू, स्मूदी अशा अनेक पदार्थांमध्ये केला जातो. अळशीत असणारे पौष्टिक घटक शरीरासाठी व हृदयासाठी अधिक फायदेशीर असतात. यामध्ये फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम असे आवश्यक पोषक घटक यात आढळतात. याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. अळशीच्या बियांचा आपल्या शरीरासाठी फायदा कसा होते ते पाहूया.(Flax seeds Benefits)

१. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. जे आपल्या हृदयासाठी अतिशय निरोगी आहे. सतत जळजळचा त्रास होत असेल किंवा रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास याचे सेवन करावे यामुळे फायदा होईल.

benefits of Flaxseed in Marathi, Flaxseed Benefits
Folic acid benefits : गर्भावस्थेत फॉलिक अॅसिड अधिक गरजेचे का असते ?

२. अळशीच्या बियांमध्ये कर्करोगापासून लढण्याचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. तसेच स्तनाच्या कर्करोगाचा धोका यामुळे कमी करु शकतो.

३. अळशीच्या बियांमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते ज्यामुळे पचनासाठी त्याचा फायदा होतो. तसेच याचे सेवन केल्याने भूक देखील नियंत्रणात राहते. ज्यामुळे आपले वजनही कमी (Weight loss) होऊ शकते.

४. तसेच रक्तदाबाची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी अळशीचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com