
आजकाल डेटिंग अॅप्सचा वापर सामान्य झाला आहे. चांगले जीवनसाथी शोधण्यासाठी किंवा प्रासंगिक नातेसंबंधासाठी लोक डेटिंग अॅप्स वापरतात. जर तुम्हीही डेटिंग अॅप वापरत असल्यास तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
डेटिंग अॅप (Dating App) वापरण्याचे काही तोटे असू शकतात. हा अॅप वापरताना, स्वतःची सुरक्षितता देखील खूप महत्वाची आहे. अनेकवेळा लोक डेटिंग अॅप्स डेट करायला लागतात आणि शोषणाला बळी पडतात किंवा कोणत्या ना कोणत्या फसवणुकीमध्ये अडकतात. त्यामुळे डेटिंग अॅप वापरताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते येथे पाहूयात.
लगेच भेटण्याचे प्लान करू नका
जर तुम्ही डेटिंग अॅपद्वारे एखाद्याला भेटण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आधी तुमच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. डेटिंग अॅपवर तुमच्या जोडिदाराशी तुमचे प्रोफाइल मॅच झाल्यानंतर लगेच एखाद्याला भेटण्याचे प्लान बनवू नका, त्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी तुमचा वेळ घ्या आणि मगच पुढेचे प्लान करा.
डेटपूर्वी व्हिडिओ कॉल करा
डेटिंग अॅपवरून जर तुम्ही भेटण्याचा प्लान करत असाल तर त्यापूर्वी व्हिडिओ कॉल (Video Call) करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही ज्या व्यक्तिला भेटणार असाल त्याला आधीच समजेल. फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती तीच व्यक्ती आहे की नाही ते पाहा. तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याच्या बोलण्यातून आणि देहबोलीवरूनही आपण ओळखू शकाल.
सार्वजनिक ठिकाणी भेटण्याचे प्लान करा
जर तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा भेटण्याचा प्लान करताय तर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी भेटा. जसे की उद्याने, कॅफे, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणे तुमच्यासाठी सुरक्षित असतील.
तुमच्या स्वतःच्या वाहनांनी जा
जर तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा भेटण्याचा विचार करताय तर तुम्ही स्वतःच्या वाहनांनी जा. तुमचा त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास असल्याशिवाय त्यांच्यासोबत कुठे दुसरीकडे जाऊ नका किंवा घरी (Home) सोडण्यास सांगू नका.
तुम्ही कोणाला भेटायला बाहेर जाताना तुमचे जाण्याचे ठिकाण मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना सांगा. हे तुमच्या सुरक्षा नियमांचा सगळ्यात पहिला नियम आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.