Rules For Eating Food : जेवताना आयुर्वेदातील 'हे' नियम पाळा, आजार रहातील दूर!

आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपणास पोषण देईल.
Rules For Eating Food
Rules For Eating Food Saam Tv

Rules For Eating Food : असा कुठलाही आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही, परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावे हे माहीत असते पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे या बद्दल कल्पना नसते. आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपणास पोषण देईल.

आयुर्वेदातील आहाराचे नियम -

आपल्या पोटाचे चार भाग करावेत . त्यातील दोन भाग हे घन आहारासाठी (Diet) ठेवावेत , एक भाग हा द्रव आहारासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा , जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो . आहार हा योग्य रीतीने पचला , तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य (Health) टिकून राहते .

Rules For Eating Food
Healthy Diet : सणासुदीनंतर आरोग्याची काळजी कशी घ्याल ? फॉलो करा 'हा' डाएट प्लान
  • सकाळचे व दुपारचे जेवण हे दोन घास जास्त असले तरी चालेल , मात्र रात्रीचे जेवण हे लघू असावे आणि सूर्यास्तापूर्वी ग्रहण करावे. रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनप्रक्रिया मंदावते आणि एक एक व्याधी लक्षणे दिसून येतात .

  • आहार हा ताजा बनवलेला . फ्रिजमधील थंड नसावा . तसेच फ्रिजमधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते.

  • पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही , म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोवर पुढील आहार घेऊ नये . असे न केल्याने पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांनादेखील कारणीभूत ठरू शकते. दोन जेवणांमध्ये किमान चार तासांचे अंतर असावे.

  • दुपारच्या जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे . त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि खाई खाई होत नाही .

  • रोजच्या आहारामध्ये तूप हे चार चमचे प्रत्येकी घ्यावे . ( केवळ फोडणीपुरते नाही ) तूप हे पाचक अग्नीस प्रदीप्त करते , प्रतिकार शक्ती कायम ठेवते , तसेच ते एक उत्तम रसायनदेखील आहे . शक्यतो देशी गाईचे तूप हे उत्तम , मात्र घरी बनवलेले म्हशीचे तूपदेखील उत्तम असते .

  • सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते एक ग्लास कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे . लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त , तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो .

  • जेवणाआधी आर्धा ते पाऊण तास एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे आहार हा सुयोग्य रीतीने पचविला जातो.

  • कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये . अस वारंवार केल्यास मळमळणे , वा छातीत जळजळणे सुरू होते , तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषिले जात नाही. कारण दोहोंच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या असतात.

  • अतिशय घाईघाईने अथवा अतिशय हळू जेवू नये . पचनसंस्थेवर विपरीत प्रभाव पडतो .

  • दुपारी जेवणानंतर लगेचच जास्त वेळ झोपू नये. असे वारंवार केले गेल्यास अवाजवी स्थूलता वाढते आणि पचनही बिघडते .

Rules For Eating Food
Healthy Diet for kids: मुलांना निरोगी ठेवण्यासाठी 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश
  • दूध आणि फळे एकत्र करून घेऊ नये . जसे फुट कस्टर्ड , शिकरण . असे सवयीने वारंवार खाण्यात आले तर त्वचा रोगनिर्मिती होण्यास कारणीभूत ठरू शकते . कारण आयुर्वेदामध्ये हा विरुद्ध आहार मानला जातो.

  • अतिकोरडे , अतितेलकट , अतिगरम , अतिशीत , अतिस्निग्ध असा आहार नसावा . सर्व प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते . आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला , तर निश्चितच आरोग्य हे उत्तमच राहणार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com