
Tips For Married Couple : लग्न झालेल्या पुरुषांची एकच तक्रार असते आणि ती म्हणजे त्यांची मॅरीड लाईफ बोरिंग होणे. ज्यामुळे ते अनेकदा एक्स्ट्रा मेरिटल अफेअर्सकडे वळतात. जर तुम्हाला तुमच्या मॅरीड लाईफमध्ये रोमान्सची कमी भासत असेल तर तुमच्या पत्नी मधील दोष दाखवण्याऐवजी तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करा.
पुरुषांना असं वाटतं की पत्नी फक्त खुश करण्यासाठी असते. हीच धारणा पत्नीच्या आनंदाला आणि आकांक्षा संपवून टाकते आणि त्या विवाहित (Married) नात्यामध्ये (Relationship) फक्त एक कर्तव्य पार पाडण्यासाठी राहतात. लग्न किंवा रोमान्स वरून तिचे मन उडून जाते. पत्नीकडून सुद्धा तसचं प्रेम, रोमांस आणि आकर्षण हवं असेल तर, या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या.
तुम्ही तुमच्या पत्नी सोबत नेहमी उभे रहा -
लग्न हे एक पवित्र नातं आहे. ज्यामध्ये भारतीय समाजामध्ये पूर्ण आयुष्य सोबत राहण्याची वचने दिली जातात. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत तिच्या सुखदुःखामध्ये सोबत उभे रहा. जरी ती कठीण परिस्थितीमध्ये असली तरीसुद्धा तुम्ही तिच्या बाजूने उभ राहून तिला साथ दिली पाहिजे.
आनंदी ठेवण्याची फक्तं तिची जबाबदारी नाही -
नवरा बायकोचं नात हे समान असत. जर तुम्ही तुमच्या बायकोला आनंदी ठेवण्याची चावी समजत असाल तर, हे अतिशय चुकीचे आहे. तुमचा मुड चांगला असेल तर गोडीत बोलने, आणि मुड खराब झाला असेल तर लगेच ओरडून बोलणे. अनेक भारतीय घरांमध्ये असंच पाहायला मिळतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की, दांपत्य त्यांच्या जीवनात आनंदी राहायला हवे असतील तर, दुडसटेपणापासून वाचायला हवे.
प्रेम गरजेचे आहे -
तुम्हाला तुमचे विवाहित नाते टिकवून ठेवायचे असेल आणि त्या नात्यांमध्ये गोडवा आणायचं असेल तर, तुम्ही कधी कधी एकमेकांना सरप्राईज दिले पाहिजे. तुमचं लग्न कितीही जुन असलं तरी, तुम्ही तुमच्या पार्टनरला बाहेर फिरायला घेऊन जा. सोबतच त्यांना मूवी आणि गिफ्ट द्यायला विसरू नका. सोबतच तुम्ही तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये प्रेम निर्माण करून ठेवा.
कधी बायकोवर सुद्धा खर्च करा -
बऱ्याचदा अनेक महिला घरातील खर्चासाठी बचत करण्याची जबाबदारी स्वीकारतात. महिला स्वतःसाठी एक रुपया सुद्धा खर्च करत नाहीत. परंतु दुसऱ्यांच्या खर्चासाठी नेहमी बचत करत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीसाठी छोटं का होईना गिफ्ट जरूर घ्या. तिला शॉपिंगसाठी पैसे द्या किंवा शॉपिंग साठी तिला बाहेर घेऊन जा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.