चॉपिंग बोर्ड खरेदी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

अनेकदा चॉपिंग बोर्ड वापरूनही काम लवकर होत नाही आणि भाजी चिरली जात नाही
चॉपिंग बोर्ड खरेदी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा
Kitchen hacks in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: किचनचे (Kitchen) काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी काही किचन टूल्सची आपल्याला आवश्यकता असते आणि त्यातील एक म्हणजे चॉपिंग बोर्ड. ज्याच्या मदतीने आपल्याला भाज्या किंवा इतर पदार्थ (Food) व्यवस्थित आणि पटकन कापता येतात.

हे देखील पहा -

अनेकदा चॉपिंग बोर्ड वापरूनही काम लवकर होत नाही आणि भाजी (Vegetable) चिरली जात नाही, असे अनेकवेळा आपल्यासोबत होत असते. असे घडण्याचे कारण आपण वापरत असणारे चॉपिंग बोर्ड हे योग्य नसते. चॉपिंग बोर्ड खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आता त्या कोणत्या गोष्टी आहेत, ते आपण जाणून घेऊया.

१. लाकडी चॉपिंग बोर्ड कसे खरेदी कराल -

सध्या बाजारात लाकूड, प्लास्टिक आणि स्टीलचे चॉपिंग बोर्ड उपलब्ध आहेत. पण आपल्यासाठी लाकडी चॉपिंग बोर्ड अधिक चांगले असेल. लाकडी चॉपिंग बोर्डमुळे भाजी लवकर कापली जाते व चाकूची धार खराब होत नाही. तसेच, भाजी किंवा मांस कापताना जास्त आवाज येत नाही. चॉपिंग बोर्ड खरेदी करताना त्यासाठी वापरले जाणारे लाकूड हे चांगल्या पध्दतीचे आहे की, नाही हे तपासून पहा

Kitchen hacks in marathi
Kitchen Hacks : घरगुती समस्यांवर असे उपयुक्त ठरेल मीठ !

२. कापण्याची गती तपासा-

चॉपिंग बोर्डवर आपला हात कितपत चालेल आणि चाकूची पकड आणि वेग कसा असेल, हेही आपण चॉपिंग बोर्ड खरेदी करताना पहायला हवे. यासोबतच चॉपिंग बोर्डचा आकार, जाडी आणि गुणवत्ता तपासूनच खरेदी करा. जेणेकरून ते वापरताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

३. चॉपिंग बोर्डचा आकार लक्षात ठेवा

बरेच लोक चॉपिंग बोर्ड खरेदी करताना त्याच्या आकाराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे ते वापरताना भाजी किंवा इतर पदार्थ विखुरले जातात. आपल्या स्वयंपाकघरासाठी साधारणत: १२-१८ किंवा १५-२० इंचचा चॉपिंग बोर्ड निवडावा. यामुळे आपल्याला कापताना कोणतीही अडचण येणार नाही आणि घाण पसरणार नाही. तसेच काम जलद आणि सोपे होईल

अशाप्रकारे चॉपिंग बोर्डची निवड आपण करु शकतो.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com