२ मिनिटात गाढ झोप येण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करुन बघा

आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिवसभराच्या थकव्यामुळे अंथरुणावर पडल्याबरोबर झोप येते.
२ मिनिटात गाढ झोप येण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करुन बघा
Sleeping tricks, how to sleep instantly, how to sleep quicklyब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिवसभराच्या थकव्यामुळे अंथरुणावर पडल्याबरोबर झोप येते. तर काहींना किती ही प्रयत्न करुन झोप काही लागत नाही. अशावेळी ते काही औषधांचा (Medicine) आधार घेण्याचा प्रयत्न करतात. (how to sleep instantly)

हे देखील पहा -

झोप न येण्याचे कारण कदाचित वेगवेगळे असू शकते. मानसिक व शारीरिक ताण, अस्वस्थता किंवा सतत विचार करत राहणे यामुळे ही झोप येत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. झोप न झाल्याने आपले कामात लक्ष लागत नाही. सतत डोकेदुखी किंवा आपली चिडचिड होते. अशावेळी आपल्याला झोप पटकन येण्यासाठी कोणती ट्रिक्स आपण वापरायला हव्या ते पाहूया.

Sleeping tricks, how to sleep instantly, how to sleep quickly
डेटिंग आणि रिलेशनशीपमध्ये नेमका फरक काय जाणून घ्या

आपल्या मनगटावरील नाडीच्या जवळ हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे मसाज करा. यामुळे आपलं डोक शांत होईल व झोप लागण्यास मदत होईल. मनगटाच्या आतील बाजूस पल्स पॉइंट व एक्यूप्रेशर पॉइंट असतो त्यावर दाब दिल्याने आपला मेंदू हळूहळू शांत होतो. २०१० व २०१५ च्या दरम्यान झालेल्या दोन वेगवेगळ्या स्टडीमध्ये असे समजून आले की, ज्या व्यक्तींना लवकर झोप येत नाही त्यांनी आपल्या मनगटाच्या पल्स पॉइंट प्रेशर दिल्यास शांत झोप लागते. त्यामुळे झोपे बदल असणारी समस्या कमी झाली आहे तसेच औषधे घेऊन झोपण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. परंतु, संशोधकांचे असे म्हणणे आहे की, इंसोमेनियाची समस्या (Problems) असणाऱ्या लोकांना यांचा फायदा कितपत होईल हे अद्यापह स्पष्टपणे सांगता येत नाही. पण ही पध्दत ट्राय करुन पहा आणि झोपेच्या समस्येवर मात करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com