पांढऱ्या शूजला लागलेले डाग घालवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

नवीन पांढऱ्या शूजवर डाग पडले असतील तर त्यांना फेकून देण्याऐवजी अशा प्रकारे स्वच्छ करा.
How to remove shoes stain, Tips and tricks
How to remove shoes stain, Tips and tricks ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ट्रेंडनुसार आपण बऱ्याच गोष्टी फॉलो करत असतो. कपड्यांपासून ते शूजपर्यंत अनेक ट्रेंड आपण पाहात असतो. आजकाल पांढरे शूज घालण्याची क्रेझ तरुणांपासून ते वृध्दांपर्यंत दिसून येत आहे.

हे देखील पहा -

पांढरे शूज आपल्या फॅशन लुकमध्ये सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. म्हणूनच आपण पांढऱ्या शूजला अधिक प्राधान्य देतो. परंतु, पांढरे शूज खूप लवकर घाण होतात किंवा त्यावर डाग पडतात, ज्यामुळे ते खराब दिसू लागतात. चपलांवरील घाण सहज साफ होत असली तरी शूजवरील डाग साफ करणे थोडे कठीण जाते. त्यामुळे आपल्यापैकी बरेच लोक डाग पडलेले शूज फेकून देतो पण आता आपल्याला आपले आवडते शूज फेकून देण्याची गरज नाही. या काही टिप्स (Tips) आणि ट्रिक्स फॉलो करुन आपण सहज शूजवरील डाग काढू शकतो.

या काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा -

१. शूजवरील डाग घालवण्यासाठी आपण बेबी (Baby) पावडरचा वापर करु शकतो. डाग काढून टाकण्यासाठी शूजवरील डागावर बेबी पावडर टाकून ती जागा काही वेळासाठी झाकून ठेवा. ५ मिनिटानंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ (Clean) करा. असे केल्याने शूजवरील डाग साफ होतील.

How to remove shoes stain, Tips and tricks
काळपटलेले मोजे या घरगुती उपायांनी नव्यासारखे करा !

२. शूजवरील डाग साफ करण्यासाठी आपण अमोनियाचा वापरू शकतो. कोणत्याही प्रकारचे डाग साफ करण्यासाठी अमोनिया अतिशय उपयुक्त आहे. आपण अमोनियाच्या मदतीने पांढऱ्या शूजवरील डागही साफ करू शकतो. यासाठी आपण अमोनिया आणि लिंबाचा रस घेऊन मिश्रण तयार करा. नंतर हे मिश्रण शूजवरील डागावर लावून १० मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर १० मिनिटांनी ते घासून पाण्याने स्वच्छ करा.

३. शूजवरील डाग साफ करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय बेकिंग सोड्याचा वापर. बेकिंग सोडामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे कोणत्याही प्रकारचे डाग सहज साफ करू शकतात. बेकिंग सोडा थेट डाग लागलेल्या भागावर लावून ब्रशच्या मदतीने हलकेच घासून घ्या.काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवा.

अशाप्रकारे पांढऱ्या शूजला लागलेले डाग आपण काढू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com